शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना बळी 200

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST

गेल्या २४ तासात जिल्ह्यात १७६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर आयसोलेशन वार्ड व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले ६६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. मृतांमध्ये यवतमाळ श्हरातील ६६ वर्षीय महिला, तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुष, वणी येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १७६ जणांमध्ये ११० पुरुष तर ६६ महिला आहेत.

ठळक मुद्देतिघांचा मृत्यू । १७६ नवे पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने धोक्याची पातळी गाठली आहे. सातत्याने पावणे दोनशे नवे पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहे. तर दररोज मृत्यूचाही आकडा वाढत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत तिघांचा कोरोनाने बळी घेतला. या ६० वर्ष वयोगटातील पुरुष व महिला तर ५४ वर्ष वयोगटातील एका पुरुषाचा समावेश आहे. कोरोना बळींचा आकडा हा दोनशेवर पोहोचला आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात १७६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर आयसोलेशन वार्ड व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले ६६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. मृतांमध्ये यवतमाळ श्हरातील ६६ वर्षीय महिला, तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुष, वणी येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १७६ जणांमध्ये ११० पुरुष तर ६६ महिला आहेत. यवतमाळ ५४, पांढरकवडा २१, पुसद २०, उमरखेड १०, वणी ३१, आर्णी शहरात सात, बाभूळगाव तीन, दिग्रस पाच, कळंब आठ, महागाव दोन, नेर ११ असे नवे रुग्ण आढळले आहे.जिल्ह्यात सध्या कोरोनाचे एक हजार ४०६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर होम आयसोलेशनमध्ये ३२६ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा हजार ९३२ इतकी झाली आहे. यापैकी पाच हजार पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांंना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मेडिकलच्या आयसोलेशन वार्डमध्ये २८३ रुग्ण उपचार घेत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरुवातीपासून आतापर्यंत ६६ हजार २९७ नमुने तपासणीला पाठविले. या पैकी ६५ हजार १७० नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी ५८ हजार २३८ नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे. एक हजार १२७ नमुन्यांचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. कोरोना चाचणीची गती वाढविण्यासाठी तीन खासगी लॅबलाही मान्यता दिली आहे.खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणीशासनाच्या यंत्रणेव्यतिरिक्त खासगीतही कोरोना उपचार व तपासणीचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. यवतमाळातील तीन खासगी लॅबमध्ये कोरोनाचे रॅपिड टेस्ट करण्याला परवानगी दिली आहे. तर या लॅबमध्ये आरटीपीसीआर तपासणीसाठी संशयित रुग्णाचा स्वॅबही घेतला जातो. त्याचा अहवाल नागपूर येथून मागविण्यात येतो. ही सुविधा काही दिवसांपासून सुरु आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या