शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने घेतले तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:00 IST

गुरुवारी तीन मृत्यूसह तब्बल १४० जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ तालुक्यातील ४२ वर्षीय पुरुष, पुसद येथील ६५ वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील ५५ वर्षीय महिलेचा  समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या १४० जणांमध्ये ८७ पुरुष आणि ५३ महिला आहेत.

ठळक मुद्दे१४० नवे पाॅझिटिव्ह : मृतांमध्ये यवतमाळ, पुसद, मारेगावचे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान सुरु केले आहे. डिसेंबरमध्ये नियंत्रणात आल्यासारखा वाटणारा हा विषाणू आता पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. गुरुवारी एकाच दिवसात तीन जणांचा कोरोनाने बळी गेल्यामुळे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनही हादरले आहे. तर लाॅकडाऊन होते की काय, या काळजीने सामान्य नागरिकही धास्तावले आहेत.गुरुवारी तीन मृत्यूसह तब्बल १४० जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ तालुक्यातील ४२ वर्षीय पुरुष, पुसद येथील ६५ वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील ५५ वर्षीय महिलेचा  समावेश आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या १४० जणांमध्ये ८७ पुरुष आणि ५३ महिला आहेत. यात यवतमाळ येथील ४५ रुग्ण, पुसद ३२, दारव्हा १९, बाभूळगाव १४, महागाव ८, पांढरकवडा ६, वणी ५, दिग्रस ३, घाटंजी ३, कळंब २, उमरखेड २ आणि इतर ठिकाणचा १ रुग्ण आहे.गुरूवारी एकूण १ हजार ३७१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४० जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर १२३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १३४३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ हजार ८५६ झाली आहे. दिवसभरात ९० जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १५ हजार ५९  आहे. तर जिल्ह्यात एकूण ४५४ मृत्यूची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत १ लाख ५८ हजार ४५३ नमुने पाठविले असून यापैकी १ लाख ५६ हजार ९५० प्राप्त तर १५०३ अहवाल अप्राप्त आहेत. तसेच १ लाख ४० हजार ९४ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे. 

९० जण कोरोनामुक्त जिल्ह्यात दरदिवशी कोरोना रुग्ण वाढत असले तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. गुरुवारी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ९० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या