शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे १५ तालुक्यांसाठी यवतमाळ बनले पुणे-मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

तालुक्यात नोकरी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी घर हा प्रकार यवतमाळसाठी काही नवा नाही. दारव्हा, महागाव, राळेगाव, आर्णी, घाटंजी, नेर अशा तालुक्यांत नोकरी करणारे शेकडो कर्मचारी यवतमाळात राहतात. मात्र आता यवतमाळातून येणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होण्याची भीती गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअप-डाऊन थांबवा : घाटंजीत सीमा बंद, राळेगावातून निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुणे आणि मुंबईतून मूळगावात परतलेल्या मजुरांना, विद्यार्थ्यांना गावकऱ्यांनी कोरोनामुळे कडवा विरोध केला. जिल्ह्यातील खेडूतांनी पुण्या-मुंबईत राहणाऱ्या पोटच्या पोरांनाही ‘सध्याच येऊ नका’ असे निरोप दिले होते. मात्र आता खुद्द यवतमाळ शहरातच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यातील १५ तालुक्यांनी यवतमाळ शहरालाच ‘पुण्या-मुंबई’चे स्थान दिले आहे. यवतमाळातून तालुक्यात येणाऱ्या प्रत्येकाला अडविले जात आहे.तालुक्यात नोकरी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी घर हा प्रकार यवतमाळसाठी काही नवा नाही. दारव्हा, महागाव, राळेगाव, आर्णी, घाटंजी, नेर अशा तालुक्यांत नोकरी करणारे शेकडो कर्मचारी यवतमाळात राहतात. मात्र आता यवतमाळातून येणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळे तालुक्याच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होण्याची भीती गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.या बाबीचा परिणाम म्हणजे, घाटंजी प्रशासनाने यवतमाळकडून गावात येणारे सर्व रस्ते बंद केले आहे. मानोली ते खापरी नाका या परिसरापर्यंत प्रत्येक रस्त्यावर बांबू लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर राळेगावातील कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यवतमाळातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांनी यवतमाळातून अप-डाऊन थांबवावे आणि मुख्यालयीच मुक्कामी राहावे, अशी मागणी करण्यात आली आहे.घरभाडे भत्ता, एकस्तर वेतनश्रेणीत बनवाबनवीअनेक कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणी किंवा त्याही पलिकडे खेड्यात नोकरीला आहेत. मात्र ते यवतमाळातून अप-डाउन करतात. तर दुसरीकडे मुख्यालयी राहत असल्याचे सांगत घरभाडे भत्ता, एकस्तर वेतनश्रेणी, वाहन भत्ता, प्रोत्साहन भत्ता आदी आर्थिक लाभ लाटत आहेत. कोरोनाच्या धाकापायी गावकऱ्यांनी मनाई केल्यावरही हे कर्मचारी यवतमाळातून जाणे-येणे करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांचे संबंधित आर्थिक लाभ बंद करावे, अशी मागणी होत आहे.घाटंजी येथे महिला अधिकाऱ्याला फटकाघाटंजी पंचायत समितीत एक महिला अधिकारी यवतमाळातून येणे-जाणे करते. मात्र सध्या या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाण्यास कर्मचारीच घाबरत आहे. चक्क केबिनच्या दाराबाहेर उभे राहून कर्मचारी या अधिकाºयांशी संवाद साधत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या