शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ, पुसदमध्ये कोरोनाने तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सध्या २६५ अक्टीव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण आहेत. मृतांचा आकडा ३६२ वर पोहोचला आहे. आतापर्यंंतच्या एकूण पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या दहा हजार ९६१ एवढी नोंदविली गेली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार शुक्रवारी ९५९ रिपोर्ट प्राप्त झाले. त्यापैकी ४० पाॅझिटीव्ह तर ९१९ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल दहा हजार २७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

ठळक मुद्देमहिलांचा समावेश : ४७ नवे पाॅझिटीव्ह

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने आणखी तिघांचा बळी घेतला आहे. यातील दोन जण यवतमाळातील तर एक जण पुसदमधील आहे. शुक्रवारी कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६७ व ७६ वर्षीय दोन महिला आणि पुसद शहरातील ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शुक्रवारी ४० नव्या कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर ५२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सध्या २६५ अक्टीव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण आहेत. मृतांचा आकडा ३६२ वर पोहोचला आहे. आतापर्यंंतच्या एकूण पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या दहा हजार ९६१ एवढी नोंदविली गेली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार शुक्रवारी ९५९ रिपोर्ट प्राप्त झाले. त्यापैकी ४० पाॅझिटीव्ह तर ९१९ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल दहा हजार २७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अद्यापही ८९९ संशयितांचे नमुने अप्राप्त आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या वाढत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सर्वांनाच भीती  कोरोनाची दुसरी लाट देशाबाहेर सुरू झाली आहे, देशातही रुग्ण वाढत आहे. त्यातच हिवाळा कोरोनाला पोषक आहे, असे सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये या दुसऱ्या लाटेबाबत भीतीचे वातावरण पहायला मिळते. प्रशासनही त्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, खबरदारी व तयारी करीत आहे. दुसऱ्या लाॅकडाऊनची लागली सर्वत्र हुरहूर  कोरोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी पुन्हा लाॅकडाऊन होणार असल्याची चर्चा आहे. या दुसऱ्या लाॅकडाऊनमुळे सर्वच दहशतीत आहे. हा लाॅकडाऊन झाल्यास अर्थव्यवस्था आणखी कोलमडेल अशी भीती समाजातील सर्वच घटकात पहायला मिळते. 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याDeathमृत्यू