शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यांवरही होऊ शकतो कोरोना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

मटका, जुगार, अवैध दारू, प्रतिबंधित गुटखा कुठेही सर्रास मिळतो व चालतो. कारवाईची जबाबदारी असलेल्यांचाच त्याला आशीर्वाद असतो. जगभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. हजारो लोकांचा त्यात बळी गेला आहे. महाराष्ट्रातही बळींचा आकडा एक हजारांकडे पोहोचतो आहे. किमान लॉकडाऊन काळात जीवाच्या भीतीने हे अवैध धंदे बंद असावे अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात यातील अनेक अवैध धंदे सुरू आहेत.

ठळक मुद्देखेळणाऱ्यांनो, सावधान : पिसणाऱ्यां पत्त्यांना लागतात अनेक हात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊन काळातही जुगार अड्डे बहरलेले आहेत. पण हे जुगार अड्डे धोकादायक ठरत आहेत. कारण तेथूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो ही बाब उघड झाली आहे. अमरावतीत अशाच एका जुगार अड्ड्यावरून राजकीय नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नव्हे तर या जुगार अड्डा चालकाचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.मटका, जुगार, अवैध दारू, प्रतिबंधित गुटखा कुठेही सर्रास मिळतो व चालतो. कारवाईची जबाबदारी असलेल्यांचाच त्याला आशीर्वाद असतो. जगभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. हजारो लोकांचा त्यात बळी गेला आहे. महाराष्ट्रातही बळींचा आकडा एक हजारांकडे पोहोचतो आहे. किमान लॉकडाऊन काळात जीवाच्या भीतीने हे अवैध धंदे बंद असावे अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात यातील अनेक अवैध धंदे सुरू आहेत. जुगार अड्डे-क्लबसुद्धा अनेक ठिकाणी बहरले आहेत. काहींनी शहराऐवजी ग्रामीण भागातील क्लबवर जाऊन खेळणे सुरू केले. परंतु हा जुगार जीवघेणा ठरू शकतो. अमरावती जिल्ह्यात अशाच एका जुगार क्लब चालकाचा कोरोनाने मृत्यू झाला. तर त्याच्याकडे जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या एका राजकीय नेत्याला कोरोनाचा संसर्ग झाला. तेथे खेळायला येणाऱ्या इतरांनाही हा संसर्ग असण्याची भीती वर्तविली जात आहे. कधी काळी शासनाच्या तिजोरीतील ‘ईनकम’ची छोटी चाबी सांभाळणारा हा ‘दम’दार नेता हादरला आहे. शहरापासून दूरवर त्यांच्यावर उपचार सुरू आहे.वास्तवावर घातले पांघरुणपोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली जाण्याच्या भीतीने जुगार क्लबमधून संसर्ग झाल्याची बाब शहरात कुठेही रेकॉर्डवर घेतली गेलेली नाही. ती सर्वच स्तरावरून दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु अमरावतीमधील या घटनेने जुगार खेळणाऱ्या तमाम शौकिनांना धोक्याचा इशारा दिला आहे. जुगारासाठी वाटल्या जाणाऱ्या पत्त्यांना खेळणाऱ्या अनेकांचे हात लागतात व त्यातूनच कोरोनाचा संसर्ग होतो, ही बाब स्पष्ट झाली आहे.जिल्ह्यातही राजकीय उठबसयवतमाळ जिल्ह्यातही शहर व ग्रामीण भागात अनेक जुगार क्लब सुरू आहेत. यातील काही क्लबवर राजकीय नेते-कार्यकर्त्यांची तासन्तास बैठक असते. पिसलेल्या पत्यांना त्यांचाही हात लागतो. त्यामुळे कोणत्याही जुगार अड्डा-क्लबवर खेळणाऱ्यांना कोरोनाचा धोका होऊ शकतो.संयम पाळल्यास धोका टळू शकतोशौकिनांनी जुगार अड्ड्यावर जाणे, किमान लॉकडाऊन काळात संयम राखणे जीविताच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे. काहींनी क्लबवर खेळल्यास चर्चा होते म्हणून स्वत:च्या घरीच जुगाराचे दुकान मांडण्याचा पर्याय निवडला आहे. परंतु तेथेही खेळणाऱ्या अनेकांची हात पत्त्यांना लागत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका कायम राहतो. कोरोनाच्या या महामारीत जुगार खेळणारेच नव्हे तर खर्रा, गुटखा खाणारे, गावठी-अवैध दारू पिणारे या सर्वांसाठीच जीव वाचवायचा असेल तर स्वयंशिस्त महत्वाची ठरणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या