शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करा हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 06:00 IST

यवतमाळातील तिरंगा चौकात कर्मचाऱ्यांनी धरणे देत प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली. जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन टाके, सरचिटणीस नंदकुमार बुटे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील ७५० कर्मचारी संपात सहभागी असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देसंडे अँकर । लाक्षणिक संप, ५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंदचा इशारा, यापूर्वीच्या संपाकडे दुर्लक्षाने संताप व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्य शासनाकडे असलेल्या प्रलंबित मागण्या पूर्ततेसाठी लाक्षणिक संप शनिवारी करण्यात आला. मागण्या पूर्ण न झाल्यास ५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा राज्य महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे.यवतमाळातील तिरंगा चौकात कर्मचाऱ्यांनी धरणे देत प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली. जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन टाके, सरचिटणीस नंदकुमार बुटे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील ७५० कर्मचारी संपात सहभागी असल्याचे सांगितले. यामध्ये अव्वल कारकून, कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, शिपाई या सर्वांचा सहभाग होता. महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड-पे ४३०० करावा, महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहायक करावे, आकृतीबंधाबाबत दांगट समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नायब तहसीलदार पदावर घेण्यात येत असलेल्या ३३ टक्के पदांची टक्केवारी कमी करून २० टक्के करावी, कर्मचाऱ्यांना परिक्षेच्या माध्यमातून वरिष्ठ पदावर जाण्याची संधी द्यावी, वर्ग चारच्या पदाची वर्ग तीनमध्ये पदोन्नती करताना तलाठी संवर्गातसुद्धा देण्यात यावे, यासह अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अमृत केदार, वैशाली होले, मनीषा शिरभाते, सुवर्णा शेंद्रे, शोभा मेश्राम, सविता मस्के, प्रमोद गुल्हाने, इंदल जाधव, शंकर आत्राम, आशीष जयसिंगपुरे आदींसह अनेक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.कार्यालयात शुकशुकाटमहसूल विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालयांमध्ये संपकाळात शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय याठिकाणचे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांची काही कामे होऊ शकली नाही. तसा दावा महसूल कर्मचारी संघटनेकडूनही करण्यात आला.

टॅग्स :Strikeसंप