शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या खेळीकडे काँग्रेसचे लक्ष

By admin | Updated: July 26, 2014 02:44 IST

विधानसभेसाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस काय

अजित पवार, सुनील तटकरेंचा दौरा : विधानसभेच्या वाढीव जागांवर जोर यवतमाळ : विधानसभेसाठी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस काय रणनीती तयार करते याकडे काँग्रेसचे लक्ष लागलेले आहे. ही रणनीती ठरविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शनिवारी यवतमाळात येत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये वरच्या स्तरावर विधानसभेच्या जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. राष्ट्रवादीने १४४ जागांवर दावा सांगितला आहे. तर एकही जागा वाढवून देणार नाही, ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यात बोलणी सुरू असतानाच इकडे राष्ट्रवादीने जिल्हा स्तरावरही आपली मोर्चेबांधणी चालविली आहे. स्वतंत्र लढण्याची भाषा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोनही पक्ष करीत आहे. तसे झाल्यास जिल्ह्यात काय स्थिती राहील याचा आढावा घेण्यासाठी निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार हे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घेऊन २६ जुलै रोजी यवतमाळात येत आहेत. जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. त्यापैकी मनोहरराव नाईकांच्या रुपाने पुसद हा एकमेव मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जिल्ह्यात निश्चितच राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नगरपरिषद, पंचायत समिती येथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्याच आधारावर राष्ट्रवादीने जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ वाढवून देण्याची मागणी रेटली आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट शरद पवार यांना मुंबईत भेटून जिल्ह्यातील पुसद सोबतच यवतमाळ, दिग्रस आणि उमरखेड या तीन नव्या मतदारसंघांवर दावा सांगितला होता. राष्ट्रवादीचा सर्वाधिक जोर हा यवतमाळ विधानसभा मतदारसंघावर आहे. हा मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. तीन नव्या मतदारसंघांवर दावा सांगून वाटाघाटीत किमान यवतमाळ मतदारसंघ तरी सुटावा ही राष्ट्रवादीची प्रेशर टॅक्टीस असण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे. अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या शनिवारच्या बैठकीत विधानसभेच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यासाठी काय भूमिका ठरते याकडे राष्ट्रवादीसह काँग्रेसचेही लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)४यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक चढाओढ आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांसोबतच एक माजी राज्यमंत्री, खुद्द प्रदेशाध्यक्षांनी मुलासाठी या मतदारसंघावर डोळा ठेवला आहे. त्यातच राष्ट्रवादीने यवतमाळसाठी जोरदार फिल्डींग लावल्याने काँग्रेससमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.