शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
2
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
3
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
4
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
5
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
6
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
7
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
8
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
9
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
10
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
11
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
12
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
13
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
14
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
15
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
16
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
17
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
18
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
19
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदावरून मोघे-कासावारात जुंपली

By admin | Updated: January 28, 2016 02:24 IST

काँग्रेस कमिटीच्या नव्या जिल्हाध्यक्षपदाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या मुद्यावरून प्रजासत्ताक दिनी शिवाजीराव मोघे व वामनराव कासावार यांच्यात चांगलीच जुंपली.

वादात संध्यातार्इंचीही उडी : प्रमुख स्पर्धकाला मुंबई-दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटी घडविल्याने रोष
यवतमाळ : काँग्रेस कमिटीच्या नव्या जिल्हाध्यक्षपदाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या मुद्यावरून प्रजासत्ताक दिनी शिवाजीराव मोघे व वामनराव कासावार यांच्यात चांगलीच जुंपली. या वादात संध्याताई सव्वालाखे यांनीही उडी घेत मोघेविरोधी सूर आळवला.
मंगळवारी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते-पदाधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर काँग्रेस कार्यालयात सर्व नेते बसलेले असतानाच शिवाजीराव मोघेंनी पक्ष-संघटनेचा विषय छेडला. त्यावरून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार हे मोघेंवर चांगलेच भडकले. त्यावर प्रत्येक विषय ‘पर्सनल’ घेऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न मोघेंनी केला. मात्र कासावार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. तुम्ही लोकांनी मला विविध कार्यक्रमात किती वेळा राजीनामा मागितला, तुम्ही नवा अध्यक्ष नेमत नाही आणि मला जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्याचे स्वातंत्र्यही देत नाही, अशा शब्दात कासावारांनी आपली नाराजी प्रकट केली. शिवाय जिल्हाध्यक्ष पदावर सर्व संमतीने निर्णय न घेता विशिष्ट व्यक्तीला झुकते माप देता, त्यांच्या मुंबई-दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटी-गाठी घडवून आणता, असे म्हणून कासावारांनी मोघेंच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त केला. हा वाद सुरू असतानाच संध्याताई सव्वालाखे यांनीही मोघेंना सुनावले. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समक्ष मोघे-कासावारांमधील ही तू-तू-मै-मै बराच वेळ सुरू होती. अखेर रागारागात मोघे उठून कार्यालयाबाहेर गेले. मोघेंच्याच एका कार्यकर्त्याने समजदारी दाखवित कासावारांनाही नाश्त्याच्या निमित्ताने बाहेर बोलविले. त्यामुळे हा वाद तेथे थांबला. मात्र नेत्यांमधील या वादाची दिवसभर काँग्रेसमध्ये चर्चा होती. जिल्हाध्यक्षपदासाठी मोघे गटाकडून आपल्या सोईच्या व्यक्तीचे नाव रेटले जात आहे. या व्यक्तीला मोघेंनी गेल्या आठवड्यात मुंबई-दिल्लीत पक्ष श्रेष्ठींच्या भेटीही घालून दिल्या. या भेटींसाठी आडोसा मात्र ‘आदिवासींच्या मेळाव्यासाठी सोनिया गांधींना पांढरकवड्याचे निमंत्रण’ असा घेतला जात आहे. ‘त्या’ स्पर्धक व्यक्तीच्या भेटी घालून दिल्यानेच मोघेंना कासावारांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्या व्यक्तीच्या पाठीशी मोघे असले तरी पक्षातील इतरांचा आणि विशेषता दुसऱ्या फळीचा त्या नावाला तेवढाच विरोध आहे. आयात केलेल्यांना महत्वाचे पद देऊ नये, अशी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. एकूणच प्रजासत्ताक दिनी नेत्यांमधील गटबाजीचे उघड दर्शन कार्यकर्त्यांना झाले. (जिल्हा प्रतिनिधी)