शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले

By admin | Updated: October 11, 2014 02:16 IST

भाजपा खोटी आश्वासने देवून सत्तेत आली. देशाला भुलवून स्वत: सत्तेच्या झोक्यात झुलत आहे. खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज करणे ही काँग्रेसची परंपरा नाही.

पुसद : भाजपा खोटी आश्वासने देवून सत्तेत आली. देशाला भुलवून स्वत: सत्तेच्या झोक्यात झुलत आहे. खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज करणे ही काँग्रेसची परंपरा नाही. सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने आपल्या राजवटीत देशातील शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव तथा माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी येथे केले. पुसद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. सचिन नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपा सत्तेवर आली. मात्र त्यांनी निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. जीवनावश्यक वस्तूंचे भाव, रेल्वेभाडे १४ टक्क्याने वाढल्याचे सांगत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, महाराष्ट्राची अस्मिता महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज असून मराठी बांधवांना विकासाचे मॉडेल हवे असेल तर ते महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आहेत. एक अन्नदाता जो सर्वांचं पोट भरतो आणि दुसरा मतदाता माणसाला नेता बनवितो त्यांना अतिशय महत्त्व आहे. येणाऱ्या निवडणुकीत बदल हवा असेल तर राहुल गांधी यांच्या ब्रिगेडमधील अ‍ॅड.सचिन नाईक यांना निवडून पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. मध्य प्रदेश निवासी ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या मराठी भाषणामुळे उपस्थित जनसमूदाय प्रभावीत झाला. यावेळी उमेदवार अ‍ॅड.सचिन नाईक, राहुल गांधी टिमचे विनोद राठोड (हिमाचल प्रदेश), नसीम खान (मध्य प्रदेश) यांनीही सभेला संबोधित केले. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अनंतराव देवसरकर, आमदार हरिभाऊ राठोड, डॉ.मोहमद नदीम, महेश खडसे, अजय पुरोहित, पुंडलिक टारफे, उपसभापती अवधूत मस्के, अनिल शिंदे, जकी अन्वर, अ‍ॅड.गजानन देशमुख आदी उपस्थित होते.