काँगेस आमदाराच्या वाहनाला यवतमाळ-नागपूर रोडवर भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 22:36 IST2021-01-15T22:36:09+5:302021-01-15T22:36:24+5:30
Congress MLA Car Accident : येथील जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या वाहनाला शुक्रवारी यवतमाळ-नागपूर रोडवर रात्री 9.30 वाजताच्या सुमारास अपघात झाला

काँगेस आमदाराच्या वाहनाला यवतमाळ-नागपूर रोडवर भीषण अपघात
यवतमाळ - येथील जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या वाहनाला शुक्रवारी यवतमाळ-नागपूर रोडवर रात्री 9.30 वाजताच्या सुमारास अपघात झाला, त्यात त्यांच्या आईला किरकोळ दुखापत झाली. शनिवार येथे काँग्रेसचे आंदोलन आहे. त्यासाठी मिर्झा नागपूर ला जात होते, यवतमाळ शहराबाहेरील 'चाचा का ढाबा' जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या इंडिकाने मिर्झा यांच्या वाहनाला जबर धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले. इंडिका चालक मद्य प्राशन करून असल्याचे बोलले जाते. अपघात झाला, मात्र सर्व जण सुरक्षित असल्याचे डॉ. मिर्झा यांनी 'लोकमत'ला सांगितले.