शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पुत्र हट्टापुढे काँग्रेस आमदार हतबल

By admin | Updated: September 3, 2014 23:44 IST

मोदी सरकारमुळे महायुतीला पोषक असलेले वातावरण, मतदारांचा काँग्रेसला विरोध लक्षात घेता वणीच्या काँग्रेस आमदारांनी सावध भूमिका घेतली आहे. मात्र विधानसभेसाठी मुलगा स्वत: हट्ट करीत

विधानसभा : मतदारांचा विरोध पाहून सावध पावित्रा यवतमाळ : मोदी सरकारमुळे महायुतीला पोषक असलेले वातावरण, मतदारांचा काँग्रेसला विरोध लक्षात घेता वणीच्या काँग्रेस आमदारांनी सावध भूमिका घेतली आहे. मात्र विधानसभेसाठी मुलगा स्वत: हट्ट करीत असल्याने हे आमदार हतबल झाले आहेत. वणी येथील काँग्रेसचे आमदार वामनराव कासावार सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. यापूर्वी पाच वेळा लढलेल्या निवडणुकीत त्यांना एकदाच पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी मात्र मतदारांमध्ये काहीसे काँग्रेस विरोधी वातावरण पहायला मिळत आहे. मतदारांचा काँग्रेससह आघाडीच्या विद्यमान आमदारांना विरोध आहे. या हवेचा अंदाज आमदार कासावार यांनाही आला आहे. त्यामुळेच ते सावध पावित्रा घेताना दिसत आहे. ते स्वत: विधानसभेची ही निवडणूक लढविण्याच्या मन:स्थितीत आहेत. मात्र त्याच वेळी त्यांचा मुलगा अ‍ॅड. राजीव कासावार स्वत: काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी धडपडत आहे. त्यांच्या चौकडीतील काही कार्यकर्ते त्यांना या आमदारकीसाठी ‘प्रोत्साहित’ करीत असल्याची माहिती आहे. वामनरावांनी आता थांबावे आणि आपणासाठी लॉबिंग करावी म्हणून राजीव अडून असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जाते. वामनरावांचेच देऊळ पाण्यात आहे. मुलगा उमेदवार असला तर ही राजकीय स्थिती आणखीन हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्याचा अंदाज आल्याने वामनराव कासावार ‘ही पंचवार्षिक थांब, नंतर तुझे पाहू’ असा सल्ला मुलाला देत आहे. मात्र मुलगा ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने वामनराव हतबल झाले आहे. मुलाला पुढे करून वणी मतदारसंघाची राजकीय सूत्रे अप्रत्यक्ष आपल्या हाती रहावी, पाच वर्षे ‘दुकान’ सुरळीत चालावे असा चौकडीतील काहींचा मनसुबा आहे. मात्र वामनराव हा मनसुबा यशस्वी होऊ देण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यामुळेच त्यांनी राजीवला आणखी पाच वर्ष मतदारसंघात संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. राजीव हा सल्ला कितपत मनावर घेतात यावर वणी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे पिता लढणार की पूत्र याचा फैसला अवलंबून आहे. अशीच काहीशी स्थिती पुसदमध्येही होती. मात्र घरातूनच जोरदार लॉबिंग झाल्याने अखेर भाऊंना रिंगणातून बाहेर पडून मुलाच्या हाती सूत्रे द्यावी लागली, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)