शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला चुका भोवल्या

By admin | Updated: May 17, 2014 02:09 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभेत काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी अनेक घटक जबाबदार मानले जाते. काँग्रेस-राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर प्रचंड विरोधी वातावरण होते.

सुरेंद्र राऊत - यवतमाळ

यवतमाळ-वाशिम लोकसभेत काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी अनेक घटक जबाबदार मानले जाते. काँग्रेस-राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर प्रचंड विरोधी वातावरण होते. थेट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात काँग्रेसने मोठा मोर्चा काढला होता. पक्षातील कुरघोडीतच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मशगूल होते. ऐन लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर समेटाची भूमिका घेण्यात आली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. याचे परिणाम या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट समोर आले आहे.

काँग्रेसने अगदी शेवटच्या क्षणी मोघे यांना उमेदवारी घोषित केली. यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्राबाहेरचे आमदार असलेले मोघे यांनी आपल्या सामाजिक न्यायमंत्रीपदाचा जिल्ह्याच्या जडणघडणीत कुठलाच उपयोग केला नाही. किंबहूना सलग तिनदा आदिवासी मंत्री म्हणून मोघे यांनी पद उपभोगले आहे. याचा आदिवासी समाजाच्या विकासासाठीही विशेष फायदा झाला नाही. लोकसभेला उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यानंतर मोघेंनी आपल्या समाजबांधवांना साद घातली. यावेळी जाहीररीत्याच मोघेंची उपलब्धी काय, असा प्रश्न आदिवासी समाजबांधवांकडून विचारण्यात येवू लागला.

महायुतीने प्रचारात आघाडी घेण्यासाठी पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी ‘विकास पुरुष’चा नारा देत माहोल तयार केला. शिवाय शिवसेना खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड यांनी भाजपापेक्षाही आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा धडाका सुरू ठेवला. दुर्देवाने याच काळात काँग्रेस व राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी आरोप-प्रत्यारोप करण्यात मशगूल राहिले. आर्णी विधानसभा क्षेत्रातून अचानकपणे शिवाजीराव मोघे लोकसभेच्या आखाड्यात उतरले. मुळात या जागेसाठी राहुल गांधी युवा ब्रिगेडमधून उमेदवारी निश्‍चित माणून राहुल ठाकरे यांनी वर्षभरापासून तयार केली होती. ऐन वेळेवर श्रेष्ठींकडूनच डॉज मिळाल्याने काँग्रेसच्या युवा वर्गात नाराजीची लाट पसरली. राष्ट्रवादीनेही केवळ वरिष्ठांचे आदेश म्हणून जुळवून घेतले. पण त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात अशी होती. त्यामुळेच जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी बाकावरील काँग्रेसच्या सदस्यांनी आपल्या सर्कलमध्ये फारसा जोर लावला नाही. याउलट शिवसेना-भाजपने ‘अभी नही तो कभी नही’ची भूमिका घेऊन प्रचार केला. परिणामी काँग्रेसच्या पारंपरिक मताला तोडण्यात यश आले. रिपाईंच्या आठवले गटामुळे राबविलेला ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग बर्‍याचअंशी यशस्वी ठरला. याचा अंदाज सलग सत्ता भोगून मस्त झालेल्या आघाडीच्या स्थानिक नेत्यांना आला नाही. त्यामुळेच पराभवाचा उंबरठा पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवाराला ओलांडावा लागला.