शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

पुत्रप्रेमापोटी काँग्रेसचे उमेदवार वाऱ्यावर

By admin | Updated: October 9, 2014 23:08 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या पक्षीय प्रचार अभियानात पुत्र प्रेमाचा अडसर ठरला आहे. मुलगा राहुल यवतमाळ मतदारसंघात निवडणूक लढवीत असल्याने माणिकरावांनी आपले संपूर्ण लक्ष

विधानसभा निवडणूक : प्रदेशाध्यक्षांचे संपूर्ण लक्ष केवळ यवतमाळ मतदार संघातचयवतमाळ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या पक्षीय प्रचार अभियानात पुत्र प्रेमाचा अडसर ठरला आहे. मुलगा राहुल यवतमाळ मतदारसंघात निवडणूक लढवीत असल्याने माणिकरावांनी आपले संपूर्ण लक्ष याच मतदारसंघावर केंद्रीत केले आहे. पक्षाचे जिल्ह्यातील अन्य सहा उमेदवार माणिकरावांनी वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काँग्रेसने जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहे. वणीमधून वामनराव कासावार, आर्णीतून अ‍ॅड.शिवाजीराव मोघे, राळेगावातून प्रा.वसंत पुरके, यवतमाळातून राहुल ठाकरे, दिग्रसमधून देवानंद पवार, पुसदमध्ये सचिन नाईक तर उमरखेडमध्ये विजय खडसे हे काँग्रेसचे उमेदवार आहे. माणिकराव ठाकरे यांचा गृहजिल्हा यवतमाळ आहे. त्यामुळे किमान आपल्या जिल्ह्यात तरी सर्व सातही जागा काँग्रेसच्या निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. गेल्या वेळी जिल्ह्यात काँग्रेसचे पाचही आमदार स्वकर्तृत्वावर निवडून आले होते. नीलेश पारवेकरांनी आपल्या कार्यकाळात पक्षात युवक काँग्रेसची फौज निर्माण केली. विकासाचा झंझावात त्यांनी निर्माण केला होता. मोघे, कासावार, पुरके यांनी निवडणुकीत अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्यातून निवडणुका कशा जिंकायच्या याचा दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मोघेंनी आपल्या खात्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. दलित-आदिवासी व गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रा. वसंत पुरके यांनीही शिक्षण मंत्री म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ प्रभावी राहिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी) प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे की यवतमाळ शहराचे ? माणिकरावांचे मुलाच्या प्रचारासाठी यवतमाळात असलेले सततचे वास्तव्य पाहता माणिकराव ठाकरे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत की, यवतमाळ शहराचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारवर नेहमीच पक्षाचे नियंत्रण राहिले आहे. परंतु याबाबतीत माणिकराव ठाकरे मुख्यमंत्र्यांपुढे कमजोर ठरले. आजही सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मुख्यमंत्र्यांवरच राज्याची प्रचाराची जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीत पार्टी फंड बाबतची माणिकरावांकडील सूत्रे काढून घेऊन त्यासाठी वेगळी यंत्रणा मुख्यमंत्र्यांनी निर्माण केली होती. विधानसभेतसुद्धा संपूर्ण सूत्रे ही मुख्यमंत्र्यांकडेच आहेत. दोन लोकसभा आणि दोन विधानसभा माणिकरावांच्या कार्यकाळात पार पडल्या. मात्र त्यातून पक्षाला काहीएक फायदा झाला नाही. उलट लोकसभेत काँग्रेसचा सफाया होऊन केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. राज्यात प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केलेले मुद्दे माणिकरावांना खोडून काढता आले नाही किंवा त्यावर प्रभावी उत्तरही ते देऊ शकलेले नाही. हे उत्तर देण्याऐवजी माणिकराव मुलाच्या प्रचारार्थ प्रदेश वाऱ्यावर सोडून केवळ यवतमाळात बसून आहेत. राज्यात सरकारने विकास कामे केली. मात्र ही कामे जनतेपर्यंत पोहाचू शकली नाही. यावरून माणिकरावांचे संघटन कौशल्य किती कमजोर आहे आणि त्यांच्या कार्यकाळात पक्ष-संघटनेची काय अवस्था झाली हे लक्षात येते.