शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक बंदच

By admin | Updated: October 3, 2016 00:08 IST

नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास त्याची माहिती विमा कंपनीला ४८ तासाच्या आत देणे बंधनकारक आहे.

शेतकरी संभ्रमात : नुकसानीची माहिती ४८ तासात देणे बंधनकारकविवेक ठाकरे  दारव्हा नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास त्याची माहिती विमा कंपनीला ४८ तासाच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिसाद देत नाही. त्यामुळे अतिपावसाने झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी कशी असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे पडला आहे. जिल्ह्यातील दोन लाख ८५ हजार शेतकरी यामुळे संभ्रमात सापडले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला. राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला. यवतमाळ जिल्ह्यासाठी शासनाने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी निश्चित केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती ४८ तासाच्या आत संबंधित केंद्रीय टोल फ्री क्रमांकावर देणे निर्धारित केले आहे. त्यासाठी विमा कंपन्यांचा दूरध्वनी आणि फॅक्स क्रमांक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून टोल फ्री क्रमांक बंद आहे. सुरुवातीच्या काही दिवसात फॅक्सवरून काही शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारल्या. परंतु आता हा क्रमांकही बंद पडला आहे. यावर्षी अतिपावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सोयाबीन उद्ध्वस्त झाला असून कपाशी आणि तूर पीकही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही योजना लाभदायी ठरते. मात्र या योजनेत अवघ्या ४८ तासात माहिती देणे बंधनकारक आहे. त्यातच आता टोल फ्री क्रमांक आणि फॅक्स क्रमांकही बंद पडला आहे. त्यामुळे माहिती सांगावी कुणाला असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. सुरुवातीला पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास झाला. अर्जाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने मुदत वाढवून द्यावी लागली होती. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी विमा काढला. मात्र आता नुकसान होत असताना त्यांचा टोल फ्री क्रमांक बंद असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.४४ कोटींचा विमा हप्तायवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख ८५ हजार शेतकऱ्यांनी ४३ कोटी ६५ लाख रुपयांचा विमा हप्ता सदर कंपनीकडे भरला आहे. त्यात कर्जदार एक लाख ३९ हजार ७२५ शेतकऱ्यांनी ३२ कोटी १३ लाख ३२ हजार आणि बिगर कर्जदार एक लाख ४६ हजार ९१ शेतकऱ्यांनी ११ कोटी ५२ लाख ४७ हजार रुपये भरले आहे. आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असताना टोल फ्री क्रमांकच बंद आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना टोल फ्री क्रमांक : १८००२७००४६२फॅक्स क्रमांक : ०२०-३०५६५१४३