शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक भोगताहेत नरकयातना

By admin | Updated: October 8, 2015 02:16 IST

शहरालगतच्या लोहारा या मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रात सदनिकांची गर्दी वाढली आहे. ग्रामपंचायतींकडून बांधकामासाठी परवानगीही सर्रास दिली जात आहे.

लोहारा ग्रामपंचायत : सदनिकातील सांडपाण्याचे नियोजनच नाहीयवतमाळ : शहरालगतच्या लोहारा या मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रात सदनिकांची गर्दी वाढली आहे. ग्रामपंचायतींकडून बांधकामासाठी परवानगीही सर्रास दिली जात आहे. मात्र सांडपाणी वाहून जाण्यासाठी कुठल्या उपाययोजना करण्यात आल्या, याची तपासणी केली जात नाही. परिणामी नागरी वसाहतींमध्ये सांडपाण्याचे गटारं तयार झालेले आहेत. या प्रकारातून नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. या ग्रामपंचायतीत सत्ताबदल झाला आहे. नवीन पदाधिकारी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा आहे.या ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्र.५ मध्ये तर सदर प्रकाराचा कळस झाला आहे. जवळपास सदनिकांचे सांडपाणी खुल्या जागेत सोडून देण्यात आलेले आहे. वाघापूर ते लोहारा या बायपास मार्गावर एका मंगल कार्यालयामागे असलेल्या सदनिकेतून सांडपाण्याचा लोट मुख्य रस्त्याच्या बाजूने वाहतो आहे. अमरावती मार्गावर असलेल्या दोन मोठ्या सदनिकांमधील पाण्यामुळे त्याठिकाणी गटारगंगा तयार झाली आहे. मातोश्रीनगर, महावीरनगर यासह या भागातील इतर वसाहतींमध्ये डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. अमरावती मार्गावर सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोठमोठ्या नाल्या तयार करण्यात आलेल्या आहे. परंतु त्याचा कुठलाही उपयोग होत नाही. एकवीरा चौकापासून पुढे काही अंतरावर तर या नाल्या अक्षरश: तोडून टाकलेल्या आहेत. बहुतांश भाग अतिक्रमणात आणि गाळाने भरला असल्याने निरूपयोगी ठरत आहे. या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी त्रस्त नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)