शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

पाथ्रड गोळे येथे तहसीलदाराला घेराव

By admin | Updated: November 22, 2014 01:55 IST

जनक्षोभापुढे प्रशासनाला नमते घ्यावेच लागते. याचा प्रत्येय तालुक्यातील पाथ्रड गोळे येथे आला. रेशन आणि रॉकेलमध्ये होणारा गैरप्रकार....

नेर : जनक्षोभापुढे प्रशासनाला नमते घ्यावेच लागते. याचा प्रत्येय तालुक्यातील पाथ्रड गोळे येथे आला. रेशन आणि रॉकेलमध्ये होणारा गैरप्रकार त्वरित थांबवावा यासाठी ग्रामस्थांनी चक्क तहसीलदाराला घेराव घातला. ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्यामुळे अखेर तहसीलदारांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. पाथ्रड गोळे येथे स्वस्त धान्य दुकानात धान्याचा आणि रॉकेलचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. मात्र तहसीलच्या पुरवठा विभागातूनच या गैरप्रकारासाठी पाठबळ मिळत असल्याने कुठलीही कारवाई केल्या गेली नाही. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट तहसील कार्यालयावर धडक दिली. गुरूवारी दुपारी १२ वाजता तहसीलदारांच्या कक्षात ग्रामस्थांनी धरणे दिले. तातडीने चौकशी करून कारवाई केली जावी अशी मागणी लावून धरली. त्यासाठी चक्क तहसीलदारांना घेराव घातला. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे तहसील परिसरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यानंतर लगेचच नायब तहसीलदाराच्या समितीने गावात भेट देऊन चौकशी केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामस्थांच्या रोषामधूनच गावातील अपहाराची तीव्रता दिसून येत होती. सदर स्वस्त धान्य दुकानदार नियमाप्रमाणे धान्याचे वितरण करत नाही. आलेल्यांना कोटा संपला असे सांगून परत पाठविले जाते. विशेष म्हणजे धान्य उचलल्याची नोंद रेशन कार्डवर केली जाते. धान्याच्या दराबाबतचा कुठलाही फलक लावला जात नाही. गोरगरीब आणि महिलांशी धान्य घेण्यासाठी गेले असता असभ्य वर्तणूक केली जाते. या सर्व जाचाला त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी वाचा फोडण्यासाठी तहसीलदारांना घेराव घातला. त्यानंतरच तहसीलदारांच्या निर्देशावर नायब तहसीलदाराच्या नेतृत्वात एक पथक पाथ्रड गोळे येथे पाठविण्यात आले. त्यांनी स्वस्त धान्य दुकानादाराच्या रेकार्डची तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली. या आंदोलनात प्रीतम गावंडे, आकाश तोंडरे, रवींद्र वानखडे, जानराव पडघन, पंकज खरकाडे, कैलास पडघन, हिम्मत कणसे, खुशाल गावंडे, नरहरी नागदेवते, भास्कर ढबाले, राजेंद्र चोपडे, हरीदास पडघने, शंकर राठोड, निखिल कणसे, गजानन राठोड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)