शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहारातील पूरक आहार हद्दपार

By admin | Updated: November 9, 2014 22:36 IST

डोंगराळ व बंदी भागात असलेल्या प्राथमिक शाळांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातून पूरक आहार हद्दपार झाल्याचे दिसत आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांमुळे शैक्षणिक विकासाला ग्रहण लागले

फुलसावंगी : डोंगराळ व बंदी भागात असलेल्या प्राथमिक शाळांमधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातून पूरक आहार हद्दपार झाल्याचे दिसत आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांमुळे शैक्षणिक विकासाला ग्रहण लागले असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. मात्र यावर शाळा व्यवस्थापन समित्याही बोलायला तयार नाही.ग्रामीण व दुर्गम भागातील तांडे आणि वस्तीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. शिक्षणासोबतच सुदृढ आरोग्य व कुपोषण टाळण्यासाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. दैनंदिन आहारातून विशिष्ट जीवनसत्व मिळावे यासाठी पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य तसेच आठवड्यातून एक दिवस बिस्कीट, केळी अथवा अंडी देणे बंधनकारक आहे. परंतु बंदी भागातील चिखली व कोरटा परिसरातील शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणजे केवळ पिवळा भात दिला जातो. आठवड्यातून एकदा देण्यात येणारा पूरक आहार तर येथील विद्यार्थ्यांना माहीतच नाही. तो केवळ बिले काढण्यापुरताच दिसत आहे.चिखली व कोरटा केंद्रातील शिक्षक ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून येणे-जाणे करतात. कोरटा केंद्राचे केंद्र प्रमुख नांदेड जिल्ह्यातून कारभार पाहत आहे. सदर शिक्षक मुख्यालयी राहत असल्याबाबतचे पुरावे मात्र सादर केले जातात. घरभाडे भत्ता घेऊन शासनाची दिशाभूल केली जाते. अनेक विद्यार्थी शाळेत येतात परंतु त्यांना पुरक पोषण आहार मिळत नाही. शाळा व्यवस्थापन समितीचे यावर प्रत्यक्ष नियंत्रण असते. मात्र ग्रामीण भागातील अनेक शाळा व्यवस्थापन समित्या केवळ कागदोपत्री आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारावर कुणाचाही अंकुश दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थी निमूटपणे पिवळा भात खाताना दिसतात. याबाबत उमरखेडच्या शालेय पोषण आहार अधीक्षकांशी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस पूरक पोषण आहार देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक मुख्याध्यापकांनी बिलही जोडल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र विपरित परिस्थिती असल्याचे सांगितल्यावर त्यांनी या प्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)