शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती, जमातीच्या जात प्रमाणपत्रात बदल

By admin | Updated: November 20, 2014 23:00 IST

शासनाने अनुसूचित जाती, जमातीमधील नागरिकांच्या जात प्रमाणपत्रामध्ये बदल केल्याने या प्रवर्गातील नागरिकांना परत पुन्हा नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ त्यामुळे नागरिकांना

नागरिकांना त्रास : पडताळणीसाठी येरझारा, सर्वांनाच आर्थिक भुर्दंडगणेश रांगणकर - नांदेपेराशासनाने अनुसूचित जाती, जमातीमधील नागरिकांच्या जात प्रमाणपत्रामध्ये बदल केल्याने या प्रवर्गातील नागरिकांना परत पुन्हा नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. शासनाने प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे़ त्यासोबतच भूमिहीन शेतमजुरांच्या पाल्यांसाठी ‘आम आदमी विमा’ योजना सुरू केली आहे़ या योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित विद्यार्थ्याला जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक असल्याची जाचक अट आहे. त्यामुळे या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र काढले आहे़ या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सदर जात प्रमाणपत्र देऊन योजनेचा लाभही घेतला आहे़ विज्ञान शाखेत शिकणाऱ्या, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविताना जात वैधता प्रमाणपत्र मागितले जाते़ त्यासाठी विज्ञान शाखेत व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयामार्फत जुनेच जात प्रमाणपत्र जोडून अमरावती येथील विभागीय जात पडताळणी कार्यालयाकडे पडताळणी प्रस्ताव पाठविले आहे़ काही विद्यार्थ्यांनी जुन्याच जात प्रमाणपत्रावर नोकरीसुध्दा मिळविली आहे़ ज्यांनी नोकरी मिळविली, त्यांनासुध्दा आत जात वैधता प्रमाणत्र मागितले जात आहे़आता मात्र अनुसूचित जाती, जमातीच्या जात प्रमाणपत्रात शासनाने बदल केला आहे. त्यामुळे या प्रवर्गात्ील सर्वांना नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ परिणामी या प्रवर्गाील नागरिक आणि विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंडासह नाहक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे़ तथापि शासनाने याबाबत कोणतेही शुध्दीपत्रकही काढले नाही़ केवळ मंत्रालयातील सचिवांचे पत्र पुढे करून नवीन जात प्रमाणपत्र प्रत्येक तहसील कार्यालयातून दिले जात आहे़ मात्र या प्रवर्गातील नागरिकांना याबाबत कोणतीही कल्पना नाही़ जे विद्यार्थी, नोकरदार आपले जुने जात प्रमाणपत्र घेऊन अमरावती येथील जात पडताळणी समिती कार्यालयात प्रस्ताव घेऊन जात आहे, त्यांना आता नवीन जात प्रमाणपत्र काढून ते जोडून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले जात आहे. शासनाच्या वेळोवेळी बदलणाऱ्या अशा निर्णयांमुळे या प्रवर्गात्ील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मात्र नाहक प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़पडताळणी जिल्हा ठिकाणी करावीविभागीय जात पडताळणी समितीचे कार्यालय अमरावती येथे आहे. वणीपासून हे ठिकाण किमान २०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे अमरावती येथे येण्या-जाण्याच्या प्रवासातच विद्यार्थ्यांचा वेळ निघून जातो़ त्याचबरोबर समितीचाही भोंगळ कारभार असल्याने दोन-चारदा चकरा माराव्या लागतात़ त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. जात पडताळणी समिती कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे़