शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बंद पडलेल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची वाताहत

By admin | Updated: September 3, 2014 00:05 IST

तालुक्यातील बंद पडलेल्या एका आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची पुरती वाताहत होत आहे. समायोजनाच्या नावाखाली केवळ त्यांची बोळवण केली जात असून एका शासकीय आश्रमशाळेवर नियुक्ती देण्यात आली.

पुसद : तालुक्यातील बंद पडलेल्या एका आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची पुरती वाताहत होत आहे. समायोजनाच्या नावाखाली केवळ त्यांची बोळवण केली जात असून एका शासकीय आश्रमशाळेवर नियुक्ती देण्यात आली. मात्र तेथेही अतिरिक्त ठरविण्यात आले. आता या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून शिक्षक दिनापासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.पुसद तालुक्यातील धुंदी येथे बद्दूसिंग आडे विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा आहे. ही आश्रमशाळा महाराष्ट्र शासनाच्या विमाप्र कल्याण संचालनालयाकडून बंद करण्यात आली. तेथील सर्व कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या व्यवस्थेंतर्गत अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळेवर नियुक्ती दिली. मात्र तेथेही त्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले नाही. समायोजन व्हावे म्हणून उच्च न्यायालयात दाद मागितली. तत्कालीन समाज कल्याण अधिकाऱ्यांनी तुम्ही न्यायालयात दाद का मागितली म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांना शासकीय निवासी शाळेतून १४ फेब्रुवारी २०१४ रोजी कार्यमुक्त केले. बंद शाळेच्या आस्थापनेपासून जानेवारी २०१४ पर्यंतचे सर्व कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले. मात्र या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक कार्यापासून कार्यमुक्त केले. त्यामुळे फेब्रुवारीपासून त्यांना वेतनच मिळाले नाही. सहायक आयुक्तांनी १ मार्च रोजी या कर्मचाऱ्यांना आश्रमशाळा मोहा, कोपरा, वडगाव, माळहिवरा, महाळुंगी येथे रुजू होण्याचे आदेश दिले. परंतु तेथील शालेय व्यवस्थापनाने जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगून आयुक्तांचा आदेश धुडकावला. एकीकडे कार्यमुक्त करून दुसरीकडे जागा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी रुजू करण्याचा आदेश म्हणजे सूडबुद्धीने केलेली कारवाई होय, असा आरोप कर्मचारी करीत आहे. या सर्व प्रकारामुळे सदर कर्मचारी मात्र अडचणीत आले आहे. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत त्यांनी सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास ५ सप्टेंबर शिक्षक दिनी सहकुटुंब उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. (वार्ताहर)