शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी, सोयाबीन संकटात

By admin | Updated: October 26, 2014 22:48 IST

गेल्या दोन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस येत असल्याने खरिपातील ५३ हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहे. कपाशी आणि सोयाबिनचे या वातावरणाने नुकसान होण्याची शक्यता

वणी : गेल्या दोन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस येत असल्याने खरिपातील ५३ हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहे. कपाशी आणि सोयाबिनचे या वातावरणाने नुकसान होण्याची शक्यता असल्याने बळीराजा पुन्हा एकदा धास्तावला आहे. कापूस वेचणी आणि सोयबीन सवंगणीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड धावपळ होत आहे.मृग नक्षत्रापासून दडी मारलेल्या पावसाने नंतर दोन दिवस संततधार हजेरी लावली होती. तत्पूर्वी महिनाभर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. पहिल्यांदा मोड आल्याने शेतकरी संकटात सापडले होते. अखेर कशी तरी वणी तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. मात्र पावसाअभावी तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवरवर शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. सध्या तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, ७ हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, ५ हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारी उभी आहे. आता कपाशी फुटली आहे. शेतात पांढरी बोंडे दिसत आहे. सोबतच सोयाबिनही आता सवंगणीला आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच सोयाबिनची सवंगणीही केली आहे. त्यांनी शेतातच सोयाबिनचे ढीग मारून ठेवले आहेत. काही शेते कापसाने पांढरी दिसू लागली आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस आणि ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.गेल्या शुक्रवारपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दिवसा आणि रात्रीही तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील कापूस ओला होत आहे. परिणामी त्याची प्रतवारी घसरण्याची चिंता सतावत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस कुटून आहे. मात्र दिवाळीमुळे वेचणीला मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे हा कापूस शेतातच ओला होत आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबिनची सवंगणी केली आहे. त्यांनी शेतात सोयाबिनचे ढिग लावले आहे. दिवाळीमुळे मजूर न मिळाल्याने त्यांना सोयाबीन काढता आले नाही. आता सोयाबिनचे हे ढिगही पावसाने ओले होत आहे.यापूर्वी पावसाअभावी दुबार, तिबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. आधीच कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाच्या दडीने त्यांना दुसऱ्यांदा बियाणे घ्यावे लागले. आता पीक हातातोंडाशी आले असताना पुन्हा निसर्ग त्यांच्या अंत पाहात आहे. उभे पीक हातचे जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतही त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)