The bustle of social distancing from two-wheelers | दुचाकीस्वारांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

दुचाकीस्वारांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

ठळक मुद्देपांढरकवडा शहर : एका दुचाकीवरून तीन-तीनजणांचा प्रवास, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिकांना घरातून निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बाहेर निघाल्यास सोशल डिस्टंन्सींग राखण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. दुकानांमध्येसुद्धा सोशल डिस्टंन्सींग राखावे लागत आहे. परंतु शहरात डबलसीट व ट्रिपलसीट वाहन चालविणाऱ्यांकडून मात्र सोशल डिस्टंन्सींगसोबतच वाहतूक नियमांची एैसीतैसी करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.
शहरात काही चालक सर्रास डबलसीट व ट्रिपलसीट दुचाकी चालवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांनी स्वयंशिस्तीचे पालन करणे अपेक्षित असतानाही काही उत्साही महाभागांमुळे सोशल डिस्टंसींगचा बोजवारा उडाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंन्सींग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यास वारंवार सांगितले जात आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टंन्सींगचा नियम पाळल्यासुद्धा जात आहे. परंतु कोणतेही काम नसताना दुचाकीवर ट्रिपलसीट फिरणाऱ्यांचा सध्या येथे धुमाकूळ सुरू आहे. दुचाकीवर तिघेजण बसवून शहराचा फेरफटका मारल्या जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे. शहरातील अनेक चौकांमध्ये, प्रमुख मार्गांवर काही युवक सोशल डिस्टंन्सींगकडेच नाहीतर वाहतूक नियमांकडेसुद्धा दुर्लक्ष करून दुचाकींवर सर्रास ट्रिपलसीट फिरताना दिसत आहेत. ही गंभीर बाब आहे. यामुळे कोरोनासारखा भयंकर आजार रोखला तर जाणार नाही. उलट या आजाराला हे दुचाकींवर फिरणारे चालक आमंत्रण देत आहेत.

Web Title: The bustle of social distancing from two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.