शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बजेट २० कोटींचे, मजूर मात्र मिळेना

By admin | Updated: October 27, 2014 22:43 IST

मजुरांच्या हातांना गावातच काम उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला मजुरांनीच नख लावणे सुरू केले आहे. यावर्षी जिल्हा

रोजगार हमी योजना : मजूर उपलब्ध झाल्यास ५९ कोटींची कामेयवतमाळ : मजुरांच्या हातांना गावातच काम उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला मजुरांनीच नख लावणे सुरू केले आहे. यावर्षी जिल्हा प्रशासनाने २० कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन केले असले तरी प्रशासनालाही मजूर मिळण्याबाबत शंकाच आहे. मजूर उपलब्ध झाल्यास या योजनेतून जिल्ह्यात ५९ कोटी रुपयांची कामे होण्याचा अंदाज आहे. मात्र मजूर या कामावर राबण्यास गेल्या कित्येक वर्षांपासून नाखूष आहे. मजुरांच्या हाताला काम मिळावे, विकास कामांना गती यावी यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विकासात्मक कामे केली जातात. त्यामध्ये सिंचन विहीर, पांदण रस्ते, सिमेंट रस्ते, बांध बंधिस्ती, जमीन सपाटीकरण या सारख्या कामांचा समावेश असतो. जिल्हा प्रशासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नियोजन करते. परंतु या कामावर मजूरच येत नाही. परिणामी ही कामे कंत्राटदार यंत्राच्या सहाय्याने करतात आणि मजुरांची नावे रजिस्टरवर चढवितात. यातून मोठ्या प्रमाणात गैरप्रकारही उघडकीस आला. अनेक मृतांची नावे मस्टरवर चढविल्या गेली. त्यांच्या नावावरील मजुरी परस्पर लाटल्या गेली. वनविभागात झालेल्या रोहयोच्या कामाचे तर मोठे गौडबंगाल आहे. उच्चस्तरीय चौकशी होऊन अनेकांना निलंबितही व्हावे लागले. जिल्ह्यातील आठ लाख मजुरांना काम उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन पुन्हा सज्ज झाले आहे. गावपातळीवर कृती आराखडा तयार करण्यात आला. या कामाला ग्रामसभेची मंजुरी देण्यात आली. २० कोटी रुपयानची आर्थिक तरतूद यासाठी करण्यात आली. प्रत्येक मजुराला १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमीही देण्यात आली. मागेल त्याला काम उपलब्ध व्हावे अशी या योजनेत तरतूद आहे. यामध्ये वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांचाही समावेश असतो. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी १५ हजार वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे सूचविली आहे. १०० दिवस ३ हजार ३२७ मजूर कामावर राबल्यास ५९ कोटी ८९ लाख रुपये लागतील, असा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाने कामही उपलब्ध केले आहे. परंतु प्रशासनाला मजुराचीच धास्ती असते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजूर असले तरी रोजगार हमीच्या कामावर जाण्याची त्यांची इच्छा नसते. अनेकदा मजूर मंडळी शहराकडे धाव घेतील, परंतु रोजगार हमीच्या कामावर जाणार नाही, अशी अवस्था आहे. (शहर वार्ताहर)