शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेच करतात गतिरोधकाचे काम

By admin | Updated: June 15, 2014 23:49 IST

उमरखेड तालुक्यातील विडूळ परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे आता गतिरोधकाचे काम करीत आहे. या खड्ड्यांमुळे वाहने हळू जात असल्याने अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र नागरिकांना या खड्ड्यांचा नाहक

विडूळ : उमरखेड तालुक्यातील विडूळ परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे आता गतिरोधकाचे काम करीत आहे. या खड्ड्यांमुळे वाहने हळू जात असल्याने अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र नागरिकांना या खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.उमरखेड येथील बस स्थानकासमोर कित्येक दिवसांपासून गतिरोधकाची मागणी आहे. परंतु ती मागणी अद्यापही पूर्ण झाली नाही. मात्र गतिरोधकाचे काम आता रस्त्यावर पडलेले खड्डे करीत आहे. बस थांब्याजवळ मोठमोठ्ठाले खड्डे पडले आहे. या मार्गावरून ढाणकी, बिटरगाव, किनवट, देवसरी, हिमायतनगर आदी गावांना वाहने जातात. त्यामुळे मार्गावर मोठी वर्दळ असते. तसेच आॅटोरिक्षा, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर आदी अहोरात्र सुरू असतात. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावर खड्डे पडले. संपूर्ण रस्त्याची दयनीय अवस्था झाली. रस्त्याची डागडुजी मात्र बांधकाम विभागाने केली नाही. त्यामुळे खड्डे तसेच आहे. या खड्ड्यामुळे वाहन हळू चालवावे लागतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. आता नागरिक उपहासाने हे खड्डे राहू द्या, अपघात तर होत नाही ना असे म्हणत आहे. मात्र या खड्ड्यांमुळे वाहनांना मोठे नुकसान होत आहे. अनेक वाहने खड्डे आदळून नादुरुस्त होत आहे. तसेच चालकांनाही त्रास सहन करावा लागतो. संबंधित विभागाने खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा आणि गतिरोधक तयार करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)