जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

By Admin | Updated: July 2, 2017 01:25 IST2017-07-02T01:25:05+5:302017-07-02T01:25:05+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी

Blood donation camp for Jawaharlal Darda's birth anniversary | जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले आहे.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रासेयो पथक, लोकमत परिवार आणि प्रेरणास्थळ आयोजन समितीच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बाबूजींच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. गोरगरीब गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी सदर शिबिर आयोजित केले आहे.
रक्तदान शिबिरात रक्तसंकलनासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी सहकार्य करणार आहे. या शिबिरात यवतमाळ शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होवून रक्तदान करावे, असे आवाहन प्रेरणास्थळ आयोजन समिती, लोकमत परिवार आणि जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर शिबिर चालणार आहे. अधिक माहितीसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रगती पवार (७९७२४२७९८२), प्रा.पद्मिनी कौशिक (९८२३२८२३७२) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Blood donation camp for Jawaharlal Darda's birth anniversary