झोपडीत राहणाऱ्याला दिले सव्वा लाखांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 10:01 PM2019-08-18T22:01:59+5:302019-08-18T22:04:47+5:30

येथून जवळच असलेल्या गणेशपूर (ख.) येथील एका चंद्रमौळी झोपडीत आयुष्याची गुजराण करीत असलेल्या वृद्ध ग्राहकाला महावितरणने तब्बल एक लाख २८ हजार ४०० रूपयांचे वीज बिल पाठविले. त्यामुळे हे बिल पाहून सदर वृद्ध दांपत्य अचंबित झाले आहे.

The bill of all lakhs paid to the person living in the hut | झोपडीत राहणाऱ्याला दिले सव्वा लाखांचे बिल

झोपडीत राहणाऱ्याला दिले सव्वा लाखांचे बिल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुकूटबन : येथून जवळच असलेल्या गणेशपूर (ख.) येथील एका चंद्रमौळी झोपडीत आयुष्याची गुजराण करीत असलेल्या वृद्ध ग्राहकाला महावितरणने तब्बल एक लाख २८ हजार ४०० रूपयांचे वीज बिल पाठविले. त्यामुळे हे बिल पाहून सदर वृद्ध दांपत्य अचंबित झाले आहे.
नानाजी साधु निखाडे (६५) असे सदर वृद्धाचे नाव आहे. त्यांच्याकडे चार एकर शेती असून या शेतीच्या भरवशावरच ते आपली उपजिवीका भागवितात, तर कधी-कधी मोलमजुरी करून आपली गुजराण करतात. त्यांच्या घरात टेबल फॅन, तीन बल्ब असून आजपर्यंत ३०० ते ३५० च्यावर कधी वीज बिल आले नाही. मागील मे, जून, जुलै महिन्याचे तीन महिन्याचे बिल थकीत राहिले. मीटरच्या नोंदीनुसार आतापर्यंत ४८ युनीट जळाले असून त्याचे बिल तब्बल एक लाख २८ हजार २४० रूपये आले आहे. त्यांच्या बिलावर मागील रिडींग एक हजार ५० व चालू रिडींग एक हजार ९८ दाखविले आहे. म्हणजेच ४८ युनीटला एवढे बिल आल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: The bill of all lakhs paid to the person living in the hut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.