शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी पीक विम्याचा मोबदला दिलाच नाही

By admin | Updated: September 8, 2014 01:51 IST

जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

यवतमाळ : जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी ३४ कोटींचा विमा मंजूर झाला. यावर्षी पावसाच्या दडीमुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचा सामना करावा लागला. अडचणीच्या काळात तातडीने आर्थिक मदत व्हावी म्हणून प्रशासनाकडून पीक विम्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीसह बँकेच्या शाखेमध्ये रक्कम वितरित करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र अनेक बँक शाखांनी शेतकऱ्यांना ही रक्कम अजूनही दिलेली नाही. आर्थिक अडचणीत विम्याला लाभ मिळूनही शेतकरी मात्र त्यापासून वंचित आहे. पीक विमा काढणाऱ्या बँक शाखांमधूनच त्याच्या मोबदल्याचेही वितरण केले जाते. विशेष करून जिल्हा मध्यवर्ती बँकेतच सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. या पीक विम्याच्या मोबदल्याची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न होता. त्या त्या बँक शाखेकडे सोपविली जाते. २९ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३४ कोटी रुपये विम्याच्या लाभापोटी मिळाले. कृषी विभाग आणि जिल्हास्तरावरील बँकांकडून ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या यादीसह बँकांच्या शाखांमध्ये जमा करण्यात आली. बँक शाखांनी ही रक्कम आल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणे बंधनकारक होते. प्रत्यक्षात मात्र बऱ्याच बँक शाखांनी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमाच केली नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेत तर आॅनलाईनच्या अडचणीची सबब सांगितली जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जोडमोहा शाखेत पीक विमा वाटपाबाबत मोठ्या प्रमाणात अनागोंदी आहे. येथील शाखा व्यवस्थापकाकडून शेतकऱ्यांना असभ्य वागणूक दिली जाते. त्यांच्या तक्रारींचीही दखल घेतली जात नाही. जिल्ह्यातील शेतकरी हा सुरुवातीला अतिवृष्टीमुळे बरबाद झाला. आता खरिपात लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे पूर्णत: नियोजन कोलमडले. अशा आर्थिक अडचणीच्या काळात पीक विम्याच्या मोबदल्यात मिळालेली रक्कम त्याला कामी पडणारी होती. परंतु बँकांच्या मनमानीमुळे अनेक शेतकरी आपल्या हक्काच्या पैशापासूनच वंचित असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळते. या बाबत कृषी अधीक्षक अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, बँकांना पैसा देण्यात आला आहे. मात्र त्याचे वाटप कितपत झाले, याची कुठलीही माहिती बँकांकडून पुरविण्यात आली नाही. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही. या बाबत जिल्हा पातळीवरच्या बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्यात येईल. बँकांनी तातडीने शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करावी, असेही निर्देश दिले जाईल. (कार्यालय प्रतिनिधी)