शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बँक शाखांची सुरक्षा आली वाऱ्यावर

By admin | Updated: August 3, 2014 00:19 IST

येथील दोन राष्ट्रीयीकृत बँका व तीन स्थानिक बँकाकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही सुविधा नाही. बँकेत ना सुरक्षा रक्षक आहे, ना सीसीटीव्ही कॅमेरे आहे़ त्यामुळे या बँकांची सुरक्षितताच धोक्यात

मारेगाव : येथील दोन राष्ट्रीयीकृत बँका व तीन स्थानिक बँकाकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही सुविधा नाही. बँकेत ना सुरक्षा रक्षक आहे, ना सीसीटीव्ही कॅमेरे आहे़ त्यामुळे या बँकांची सुरक्षितताच धोक्यात सापडली आहे़बँकात पैसे लुटण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शहरातील बँका मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्धास्त दिसून येत आहे़ येथे भारतीय स्टेट बँक, भारतीय सेंट्रल बँक, विदर्भ ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, रंगनाथ स्वामी बँकेच्या शाखा आहेत. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यापैकी एकाही बँक शाखेत सुरक्षा रक्षक नाही़तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या बँकेत ग्रामीण भागातून येणारा ग्राहक वर्ग मोठा आहे़ अशिक्षित असलेल्या या बँक ग्राहकांची बरेचदा फसवणूकही होते़ परंतु बँकेत सुरक्षा रक्षक नसल्याने कुणाची मदत घ्यावी, असा प्रश्न ग्राहकांना पडतो़ ग्राहकांच्या अज्ञानाचा लाभ घेत अनेक दलाल बँकेत सक्रिय झाले आहेत़ ग्राहकांचे विड्राल करून देणे, बँक खाते उघडण्याचा अर्ज भरून देणे, आदी कामे करून देण्याच्या नावावर ग्रामीण जनतेची आर्थिक लूट सुरू आहे़नुकतीच शहरात स्टेट बँकेतर्फे एटीएम सुविधा सुरू करण्यात आली. परंतु तेथेसुध्दा सुरक्षा रक्षक नाही किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा नाही़ शहरातील बहुतांश बँका वर्दळीपासून दूर असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. या बँकानी सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तूर्तास त्यांची सुरक्षितता वाऱ्यावरच आहे. (शहर प्रतिनिधी)