शहरं
Join us  
Trending Stories
1
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
2
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
3
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
6
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
7
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
8
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
9
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
10
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
11
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
12
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
13
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
14
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
15
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
16
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
17
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
18
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
19
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
20
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

सात ग्रामपंचायतींचे बँक खाते गोठविले

By admin | Updated: January 26, 2016 03:09 IST

नगर परिषदेच्या हद्दवाढीने समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींचे बँक खाते गोठविण्यासाठी नोटीस बजावण्यात आली.

यवतमाळ : नगर परिषदेच्या हद्दवाढीने समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींचे बँक खाते गोठविण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. सोमवारी दुपारी नगर परिषदेचे उपमुख्याधिकाऱ्यांनी सात ग्रामपंचायतींना नोटिफिकेशनची प्रत देऊन महत्वपूर्ण देस्तावेज जमा करण्याची नोटीस बजावली.
ग्रामपंचायतीचे कॅशबुक बुक, चेक बुक, बँकेचे खातेपुस्तक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती रजिस्टर ताब्यात घेतले जाणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे यापुढे नगर परिषदेच्या बँक खात्यातून मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने वेतन केले जाणार आहे. यासाठी संपूर्ण कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. सोमवारी दुपारी उपमुख्याधिकारी गोलंदाज यांनी लोहारा, मोहा, वाघापूर, पिंपळगाव, वडगाव व उमरसरा या ग्रामपंचायत कार्यालयांना भेट दिली. येथे एकही ग्रामसचिव व ग्रामविकास अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या लिपिकाला नोटीस व हद्दवाढीच्या नोटीफिकेशनची प्रत देऊन संपूर्ण दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)

वाढीव क्षेत्रातील कर आकारणी ‘जैसे थे’
४ समाविष्ठ झालेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना गृहकराबाबत पूर्वीच्या आकारणीप्रमाणेच कर भरता येईल. त्यासाठी सध्या असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात डिमांड रजिस्टर ठेवण्यात येईल. या कर वसुलीसाठी स्वतंत्र बँक खातेही सुरू ठेवले जाईल. ही कर वसुलीची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात राहणार आहे, मालमत्ता मुल्यांकन झाल्यानंतर नगर परिषदेच्या दराने कर आकारणी केली जाईल, असे यवतमाळ नगर परिषेदचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी लोकमतला सांगितले.
शहर सीमेवर यवतमाळ नगरपरिषदेचे फलक
४शहराच्या आतमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गांवर यवतमाळ नगर परिषदेची हद्द प्रारंभ असे फलक लावण्यात येणार आहे. यापूर्वी नगर परिषद परिसराला लागूनच ग्रामपंचायती असल्याने हद्दीच्या बाबत गोंधळ होत होता. आता मात्र चारही बाजूला नगर परिषद हद्द निश्चित झाली आहे.