शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
5
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
6
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
7
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
8
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
9
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
10
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
11
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
12
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
13
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
14
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
16
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
17
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
18
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
20
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
Daily Top 2Weekly Top 5

केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

By admin | Updated: December 7, 2014 22:59 IST

आधुनिकतेची कास धरत शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून नव्या पद्धतीने केळीची लागवड केली. कृषी विभागाकडून शासकीय अनुदान मिळणार या आशेवर ही लागवड केली. प्रत्यक्षात मात्र जिल्हा

गुंज : आधुनिकतेची कास धरत शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून नव्या पद्धतीने केळीची लागवड केली. कृषी विभागाकडून शासकीय अनुदान मिळणार या आशेवर ही लागवड केली. प्रत्यक्षात मात्र जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने महागाव तालुक्याला शासकीय अनुदानाच्या लाभातून वगळले. त्यामुळे आता येथील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शेतीत पारंपरिक पिकांमुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू या पिकांची शेती कायमचीच तोट्याची ठरत आहे. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी टिशू कल्चर प्रक्रिया केलेली केळीची रोपे लावली. यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज व उधार रकमाही सावकारांसह शक्य तेथून घेतल्या. शासनाकडून आर्थिक अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी आपले बागायती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचण असतानाही घडामोड केली. भविष्यात फायदा मिळणारच या हेतुने जोखीम पत्करून साडेसतरा रुपये प्रतिरोप या दराने खरेदी केली.
जवळपास २० हजार रुपये एकरी खर्च लागवडीसाठी शेतकऱ्यांना आला. दुष्काळी स्थितीतही शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग म्हणून बिकट आर्थिक स्थितीतही केळी लावण्याचा निर्णय घेतला. ऐरवी शेतकरी पारंपरिक शेतीची कास सोडण्यास तयार नाही, अशी ओरड कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून केली जाते. मात्र ज्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी नवीन प्रयोग करण्याचे धाडस केले त्यांना कुठलीही मदत देण्यासाठी मात्र तगादा लावावा लागतो. अगोदरच आर्थिक अडचणीत आलेल्या या शेतकऱ्यांना हा नवीन प्रयोग चांगलाच भोवला आहे. ऐन वेळेवर शासनाने अनुदान देण्याचे टाळले. त्यामुळे आता शेती तर सोडाच उदरनिर्वाह कसा भागवायचा हा प्रश्न तालुक्यातील केळी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. या संकटातून लवकर सुटका करावी, अशी मागणी तालुक्यातील या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (वार्ताहर)