शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी झुगारून होते खुलेआम विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

महिलांनी पुढाकार घेतला आहे. काही वर्ष गावात दारूबंदी कायम राहिली. मात्र थोडी ढील मिळताच दारू विक्रेत्यांनी महिलांना धमकाविणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले. यासोबतच पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांची साथ सोडली. यामुळे गावात पुन्हा दारूचा पूर वाहू लागला आहे. आज नागरिकांच्या मनात दारू बंद झाली पाहिजे, असा विचार कायम असला तरी त्याला राबविण्यासाठी हवे असलेले पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याचा गंभीर प्रकार पुढे येत आहे.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचे असहकार्य; महिलांना जीवे मारण्याच्या धमक्या, तरुणाई व्यसनाधीन

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात दारूबंदीची चळवळ २०१५ मध्ये उभी झाली. स्वामिनीसह काही संघटना पुढे सरसावल्या आणि २५० गावांमध्ये दारूबंदी झाली. आज जिल्ह्यातील या गावांसह इतरही गावांमध्ये दारूबंदी आहे. त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. काही वर्ष गावात दारूबंदी कायम राहिली. मात्र थोडी ढील मिळताच दारू विक्रेत्यांनी महिलांना धमकाविणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले. यासोबतच पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांची साथ सोडली. यामुळे गावात पुन्हा दारूचा पूर वाहू लागला आहे. आज नागरिकांच्या मनात दारू बंद झाली पाहिजे, असा विचार कायम असला तरी त्याला राबविण्यासाठी हवे असलेले पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याचा गंभीर प्रकार पुढे येत आहे.यवतमाळ तालुक्यातील बोथबोडनमध्ये आजही दारू विकली जाते. पूर्वी हातभट्टी होती आता देशीचे पव्वे गावामध्ये पोहोचत आहेत. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही गावांमध्ये कायम आहे. यातून गावगाडा विकासाकडे न जाता तो भरकटला जात आहे.

गावकऱ्यांच्या पाठिशीचठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये दारूबंदी करण्यासाठी आम्ही तयार आहो. गावकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास त्यांना पूर्ण मदत करू. काही ठिकाणी दारूबंदी करण्यात आली आहे. दारूबंदीला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. - विनायक कारेगावकर,ठाणेदार, लाडखेड

दारूबंदीच्या निर्णयाची प्रतीक्षातत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात दारूबंदी करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात दारूबंदी झालीच नाही. तिला केवळ राजकीय स्वरूप मिळत आहे.

धमक्यांमुळे गाव सोडलेआम्ही पहापळमध्ये दारूबंदी केली. दोन-तीन वर्ष गाव उत्तमरित्या काम करीत होते. महिलांचा चांगला सहभाग होता. पोलीस प्रशासनाची मदत होती. मात्र काही काळानी प्रशासनाची मदत दूर झाली आणि महिलांना धमक्या मिळू लागल्या. या त्रासाला कंटाळून मी गाव सोडले. मात्र काम करण्याची इच्छा अजून आहे. - भावना नव्हाते, पांढरकवडा

अजूनही जिद्द कायमजरूरमध्ये दारूबंदीसाठी आम्ही महिलांनी मिळून काम केले. गावामध्ये दोन ते तीन वर्ष दारूबंदी कायम होती. महिलांवर खोटे आरोप लागले, गुन्हे दाखल झाले. यामुळे महिला खचल्या. आज गावात दारू सुरू आहे. यातून गाव अस्वस्थ झाले आहे. पुढील काळात दारूबंदी व्हावी म्हणून आम्ही महिला काम करणार आहोत. - ललिता राठोड, जरूर, ता.घाटंजी

प्रशासनाची मदत नाहीधनज माणिकवाडामध्ये दारूबंदी करण्यात आली. या कामात सर्वांचेच सहकार्य मिळाले. मी आजारी पडलो आणि पुन्हा दारू सुरू झाली. खरं सांगायचे म्हणजे, पोलीस प्रशासनाची आम्हाला मदत मिळत नाही. यामुळे गावात दारू विकल्या जाते. दारूबंदीसाठी गावकरी तयार आहे, पोलीस यंत्रणा सोबत येईल का ? - अमित दाभेरे, तंटामुक्ती अध्यक्ष, धनज माणिकवाडा

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस