शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

बिटरगाव येथील पोलीस वसाहतीची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

सध्या ही निवासस्थाने जीर्ण अवस्थेत आहे. अनेक निवासस्थाने धोकादायक असून ती कधी कोसळतील, याचा नेम नाही. काही घरे ओसाड पडली आहे. काहींमध्ये पोलीस कुटुंब वास्तव्याला आहे. अनेक घरे दारे व खिडक्यांविना आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागते.

ठळक मुद्देघरे मोडकळीस : जनतेचे रक्षणकर्तेच भीतीच्या सावटात, २८ कर्मचाऱ्यांचे कुटुंब वाऱ्यावर

भास्कर देवकते ।लोकमत न्यूज नेटवर्कबिटरगाव : येथील पोलीस वसाहतीमधील निवासस्थानांची प्रचंड दैनावस्था झाली आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने पोलीस कुटुंबीयांचे जीवन धोक्यात आले आहे. जनतेच्या रक्षणकर्त्यांचे कुटुंबीयच भीतीच्या सावटात वावरत आहे.येथे ब्रिटिशांच्या काळात पोलीस ठाण्याची स्थापना झाली. त्याचवेळी निवासस्थाने बांधली. नंतर वेळोवेळी डागडुजी झाली. मात्र सध्या ही निवासस्थाने जीर्ण अवस्थेत आहे. अनेक निवासस्थाने धोकादायक असून ती कधी कोसळतील, याचा नेम नाही. काही घरे ओसाड पडली आहे. काहींमध्ये पोलीस कुटुंब वास्तव्याला आहे. अनेक घरे दारे व खिडक्यांविना आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागते.परिसरातील ४५ गावांतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी या पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. दोन अधिकारी आणि २८ कर्मचारी ही जबाबदारी सांभाळत आहे. मात्र त्यांच्या घरांची दूरवस्था झाल्याने त्यांच्याच कुटुंबांचे संरक्षण करणे तयांना अवघड झाले आहे. पावसाचे पाणी मुरून निवासस्थानांच्या भिंती फुगल्या आहे. पोलिसांनीच निवसस्थाने व ठाण्यावर पत्र्याचे शेड टाकले आहे. या निवासस्थानांच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.ब्रिटीेशकालीन ठाण्याची इमारतही जुनाट झाली. १९४७ मध्ये नूतन वास्तू बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र स्वातंत्र्याच्या ७0 वर्षानंतरही त्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. परिणामी धोकादायक ठाणे आणि निवासस्थानांतच अदिकरी, कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. परतीच्या पावसाने ठाण्यातील वायरलेस कक्षातील पीओपीचे छत कोसळले. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. नंतर पोलीस अधीक्षकांनी ठाण्याची तात्पुरती डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ठाण्यावर पत्र्यांचे छत टाकणे व पीओपी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.महिला सुरक्षा कक्षही धोक्यातमोडकळीस येणाऱ्या संसारात हस्य फुलविण्याचे काम पोलीस ठाण्यातील महिला सुरक्षा कक्षाकडून केले जाते. मात्र येथील या कक्षाचे कामही जीर्ण वास्तूतून केले जाते. या कक्षाची इमारत खूप जुनी आहे. ती मोडकळीस आली आहे. त्यामुळे या महिला सुरक्षा कक्षाचे कामकाज इतर इमारतीत सुरू करण्याची गरज आहे.

टॅग्स :Policeपोलिस