शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्ग कर्मचारी पदोन्नतीपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

पदोन्नतीत आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची याचिका प्रविष्ठ आहे. असे असतानाही न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून देशातील इतर राज्यांनी पदोन्नतीचे आरक्षण दिले आहे. परंतु राज्य सरकारने याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने २९ डिसेंबर २०१७ पासून पदोन्नतीला स्थगिती दिली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कास्ट्राईब सोमवारी देणार धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तत्कालीन सरकारने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील सर्व आस्थापनांमध्ये पदोन्नत्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहे. हजारो कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. महाविकास आघाडी सरकारने यासंदर्भात आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. याच प्रश्नाला घेऊन कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे सोमवार, १७ ऑगस्ट रोजी धरणे दिले जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.पदोन्नतीत आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची याचिका प्रविष्ठ आहे. असे असतानाही न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून देशातील इतर राज्यांनी पदोन्नतीचे आरक्षण दिले आहे. परंतु राज्य सरकारने याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने २९ डिसेंबर २०१७ पासून पदोन्नतीला स्थगिती दिली आहे. या बाबीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्त्वात ३ नोव्हेंबर २०१८ मध्ये ‘लोकशाही की पेशवाई’ या नावाने संपूर्ण राज्यभर धरणे दिले होते. यानंतरही शासनाने लक्ष दिले नाही.या प्रश्नासंदर्भात २१ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होत आहे. अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण हा त्यांचा संविधानिक हक्क आहे. परंतु राज्य शासन याविषयी गंभीर नसल्याचे मत निवेदनातून व्यक्त केले आहे. अनुसूचित जाती जमातीची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी राज्य शासनाने अजूनही ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्त केले नाहीत. सरकारने विशेष सरकारी वकील नेमावा, पदोन्नतीतील आरक्षण कायम राहावे यासाठी तात्काळ निर्णय होण्याकरिता राज्य शासनाने विशेष प्रयत्न करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. १७ ऑगस्टला राज्यभर ३० शाखांच्यावतीने धरणे दिले जाणार आहेत. निवेदन देताना महासंघाचे अध्यक्ष सिद्धार्थ भवरे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष किरण मानकर, महसूल संघटनेचे अध्यक्ष आनंद भगत, महासंघाचे सरचिटणीस मनोज भगत, अतुल इडपाते, अतिरिक्त सरचिटणीस विक्रांत खडतरे, अनिल मनवर, अ‍ॅड. हरिश रामटेके, छाया काळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :reservationआरक्षण