शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅन्टिबॉयोटिकच्या संतुलित वापरासाठी जागृती

By admin | Updated: April 10, 2017 01:50 IST

बाल रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी विकसित केलेल्या तंत्राचा प्रसार व प्रचार करण्यासाठी राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञ संघटना कार्यरत आहे.

संतोष सोन्स यांचे मार्गदर्शन : राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ कार्यशाळायवतमाळ : बाल रुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी विकसित केलेल्या तंत्राचा प्रसार व प्रचार करण्यासाठी राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञ संघटना कार्यरत आहे. जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची ही संघटना असून आता अ‍ॅन्टीबायोटिकांचा (प्रतिजैविके) संतुलित वापर कसा करायचा, यासाठी कार्यशाळा घेऊन जागृती कार्यक्रम राबवित असल्याचे बालरोग तज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संतोष सोन्स यांनी पत्रपरिषदेत सांगितले. बालरोग तज्ज्ञ संघटनेकडून देशात रॅशन्ल अ‍ॅन्टीबायोटिक प्रोग्राम (रॅप) राबविला जात आहे. यामध्ये बालरोग तज्ज्ञ आणि जनरल फिजीशन यांनी अ‍ॅन्टीबायोटिकचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले जाते. शिवाय पालकांमध्येही जाणीवजागृती केली जाते. अनेकदा पालकांकडूनच अ‍ॅन्टीबायोटिकची मागणी डॉक्टरांना केली जाते. अनेकदा फार्मासिस्ट अथवा वैद्यकीय क्षेत्राबाहेरील व्यक्तीकडून अ‍ॅन्टीबायोटिकचे डोज दिले जातात. याचा दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो. ‘रॅप’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जागृती केल्याने जवळपास ३० टक्के अ‍ॅन्टीबायोटिकची विक्री घटल्याचेही डॉ.सोन्स यांनी सांगितले.राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञ संघटनाही केंद्र व राज्य शासनाचे आरोग्य विषयक धोरण ठरविण्यासाठी मदत करते. मूल व माता यांच्यासाठी राबविणाऱ्यात येणाऱ्या लसीकरण व पोषण आहाराच्या योजनांचा दर्जा बालरोग तज्ज्ञ संघटनेकडूनच निश्चित केला जातो. खास करून लसीकरणात वापरली जाणारी लस, संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक कार्यक्रम राबविला जातो. संघटनेने सध्या कर्नाटक, तामिळनाडू, पॉन्डेचरी, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ या राज्यांमध्ये लसीकरणाबाबत जागृती कार्यक्रम राबविले. बालरोग तज्ज्ञांसाठी (होप) हॅन्डलिंग आॅफ पिडीयाट्रीक इमर्जन्सीज यावर यवतमाळातील कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभाग व येथील बालरोग तज्ज्ञ संघटनेतर्फे ही कार्यशाळा घेण्यात आली. अकस्मात स्थितीत आलेल्या बालरुग्णांवर उपलब्ध साधनांचा वापरुन करून कसा उपचार करावा, त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कसे पाठवावे, यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. २ ते ७ जानेवारी २०१८ या कालावधीत नागपुरात बालरोग तज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद आयोजित असल्याचे बालरोग तज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.वसंत खलतकर यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. संजीव जोशी उपस्थित होते. कार्यशाळेला यवतमाळसह जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (कार्यालय प्रतिनिधी)