शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच कोटींसाठी लिलावाचा प्रस्ताव

By admin | Updated: August 4, 2014 23:57 IST

साडेपाच कोटी रुपयांच्या कर्जाच्या वसुलीसाठी धामणगाव रोडवरील सहकार जिनिंग प्रेसिंगची जागा विक्री करण्याचा प्रस्ताव जिल्हा बँकेला देण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव घाईगडबडीत मंजूर

मनसुभा उधळला : धामणगाव रोडवरील सहकार जिनिंगची जागायवतमाळ : साडेपाच कोटी रुपयांच्या कर्जाच्या वसुलीसाठी धामणगाव रोडवरील सहकार जिनिंग प्रेसिंगची जागा विक्री करण्याचा प्रस्ताव जिल्हा बँकेला देण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव घाईगडबडीत मंजूर करण्याचा मनसुबा काही संचालकांनी उधळून लावला. आता हा प्रस्ताव नव्याने संचालक मंडळासमोर ठेवला जाईल. यवतमाळ सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीने सन २००८ मध्ये तीन कोटी ६० लाख रुपयांच्या कर्जाची उचल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून केली होती. जिनिंग व्यवसाय वाढविणे व त्याचे आधुनिकीकरण करणे यासाठी बँकेने हे कर्ज मंजूर केले होते. मात्र तेव्हापासून सदर संस्थेने कर्जाची परतफेड केली नाही. त्या कर्जावर एक कोटी ९१ लाखांचे व्याज चढवून कर्जाचा हा आकडा ३० जून २०१४ अखेर पाच कोटी ५१ लाख ४५ हजार १०३ रुपये एवढा झाला आहे. सदर जिनिंग कर्जाची परतफेड करू न शकल्याने बँकेने या जिनिंगचे खाते अनुत्पादक (एनपीए) केले आहे. त्यामुळे या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने जिनिंगला ६० दिवसांची नोटीस बजावली होती. या कर्जाची परतफेड न झाल्यास तारण मालमत्तेचा ताबा, हस्तांतरण व लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर जिनिंगच्या संचालक मंडळ व आमसभेने संस्थेच्या मोकळ्या जागेपैकी धामणगाव रोडला लागून असलेल्या ७४ हजार ५२४ चौरस फूट जागेची विक्री करण्याचा व त्यातून कर्जाची वसुली करण्याचा प्रस्ताव जिनिंगने जिल्हा बँकेपुढे ठेवला. जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत जागेच्या लिलावाचा हा प्रस्ताव ऐनवेळी अध्यक्षांच्या परवानगीने चर्चेला आणला गेला. त्यावर काही ज्येष्ठ संचालकांनी तीव्र आक्षेप नोंदविला. साडेपाच कोटींचे कर्ज आणि त्यासाठी ७४ हजार चौरस फूट जागेच्या लिलावाचा विषय चोर मार्गाने आणण्यामागील रहस्य काय असा प्रश्न उपस्थित केला गेला. एवढा मोठा विषय असल्याने तो विषय पत्रिकेवर सविस्तर माहितीसह ठेवला जावा, अशी सूचना मांडली गेली. त्यानुसार संचालकांच्या आगामी बैठकीत हा विषय पुन्हा चर्चेला ठेवला जाणार आहे. या माध्यमातून झटपट जागेचा लिलाव करण्याचा मनसुबा मात्र उधळला गेला. जिनिंगच्या व्यवसाय वाढ व आधुनिकीकरणासाठी जे तीन कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज दिले गेले होते त्यात खरोखरच हे काम झाले आहे का अशी विचारणाही केली गेली. काही संचालकांनी त्यावर शंकाही व्यक्त केली. एवढ्या रकमेत नवीन जिनिंग स्थापने शक्य असल्याने हा निधी खरोखरच त्या कामावर खर्च झाला का याची तपासणी गरजेचे असल्याचे एका संचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. तर आर्णीतील जिनिंगच्या धर्तीवर नियमानुसार या जिनिंगच्या संपूर्ण मालमत्तेचा लिलाव करून वसुली केली जावी, असा मुद्दाही एका संचालकाने पुढे केला. (जिल्हा प्रतिनिधी)