शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

हल्लाबोल आंदोलन

By admin | Updated: August 16, 2014 23:43 IST

विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुबार पेरणीची मदत, २०१३ च्या यादीनुसार सर्व गरिबांना बीपीएलचे कार्ड, आदिवासींना खावटी आणि सर्व गरिबांना घरकूल व अंत्योदय योजना लागू करावी

‘गाव तेथे उपोषण’ : शेतकऱ्यांचा एकमुखी ठरावपांढरकवडा : विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, दुबार पेरणीची मदत, २०१३ च्या यादीनुसार सर्व गरिबांना बीपीएलचे कार्ड, आदिवासींना खावटी आणि सर्व गरिबांना घरकूल व अंत्योदय योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी स्वातंत्र्य दिनी येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी बांधव सहभागी झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी यांनी केले. दुपारी १ वाजता येथील शिवाजी पुतळ्याजवळून केळापूर, घाटंजी, आर्णी, वणी, मारेगाव, राळेगाव, झरी आदी तालुक्यातून आलेले शेतकरी, शेतमजूर, आदिवासी महिला-पुरुष तहसील कार्यालयात धडकले. याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. येत्या २० दिवसात सरकारने मागण्या मान्य न केल्यास ‘गाव तेथे उपोषणा’चा ठराव यावेळी घेण्यात आला.सभेला संबोधित करताना किशोर तिवारी म्हणाले, आमचा लढा शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासींच्या सुखासाठी आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला आहे. विविध प्रश्नांनी भीषण रूप धारण केले असताना या सर्व प्रश्नांकडे महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत आहे. अशा सरकारला जाब विचारण्यासाठी आणि हक्काच्या मागणीसाठी शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी रस्त्यावर उतरले आहे. आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. म्हणून आमचे आंदोलन, आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहील. राजकारणी लोकांनाही आता धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.सभेप्रसंगी अनिल तिवारी, मोहन मामीडवार, मोरेश्वर वातीले, मुबारक तंवर, ताराबाई पाटील आदींनीही मार्गदर्शन केले. सभेनंतर जिल्ह्यातून आलेल्या शेतकरी, शेतमजुरांचे निवेदन घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी संदीप महाजन यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. सरकारने कोरडवाहू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मोहन जाधव, अंकित नैताम, मनोज मेश्राम, सुरेश बोलेनवार, प्रीतम ठाकूर, भीमराव नैताम, नंदकिशोर जयस्वाल, शेखर जोशी आदींनी पुढाकार घेतला. (शहर प्रतिनिधी)