शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकावर ‘मोझॅक’ रोगाचे आक्रमण

By admin | Updated: September 10, 2014 23:59 IST

यंदा खरीपाच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची निर्माण झालेली टंचाई. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी मिळेल तसे आणि मिळेल तेथून सोयाबीन बियाणे खरेदी केले. मात्र आता सोयाबीनवर मोझॅक या

यवतमाळ : यंदा खरीपाच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची निर्माण झालेली टंचाई. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी मिळेल तसे आणि मिळेल तेथून सोयाबीन बियाणे खरेदी केले. मात्र आता सोयाबीनवर मोझॅक या रोगाचे आक्रमण झाले. विषाणूजन्य या रोगाने सोयाबीनचे मोठे क्षेत्र कवेत घेतले. बियाण्यातूनच मोझॅक पसरल्याचा संशय व्यक्त होत आहे. बियाणे निर्मिती करताना कंपन्यांनी काळजी घेतली नसल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. गत वर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. बियाणे निर्मितीसाठी असलेल्या प्लॉटचेही नुकसान झाले. परिणामी यंदा खरीपाच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची प्रचंड टंचाई निर्माण झाली. जिल्ह्यात अपेक्षित बियाण्यांच्या ३० टक्केच बियाणे उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाहेरील जिल्ह्यातून बियाणे खरेदी केले. तर काही शेतकऱ्यांनी कृषीविभागाच्या सल्ल्यानुसार घरीच बियाणे तयार केले. अनेक कंपन्यांनी याच परिस्थितीचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारले. सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे पेरण्या लांबल्या. एकदाची पेरणी आटोपली मात्र त्यानंतर पावसाचा पत्ता नाही. पोळ््यापासून पावसाला सुरूवात झाली. पिके जोमाने वाढू लागली, आणि अशातच सोयाबीन, कपाशीवर किडींनी आक्रमण केले. जिल्ह्यात दोन लाख ३४ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. सध्या सोयाबीनवर मोझॅक या जिवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेंड्याकडून पाने पिवळी पडून संपूर्ण झाडच पिवळे पडत आहे. रोगग्रस्त झाडाची वाढ खुंटते, पाने जाडसर होतात, अशा झाडांना शेंगाही कमी येतात. निरोगी झाडावर या रोगाचा प्रादुर्भाव मावा व पांढऱ्या माशीव्दारे होतो. जिल्ह्यातील मोठे क्षेत्र सध्या मोझॅक रोगाच्या कवेत आले आहे. मोझॅक रोगाचे जिवाणू बियाण्यामधूनच पसरल्याची भिती व्यक्त होत आहे. निर्मिती करताना कंपन्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांनी घरीच बियाणे तयार केले. त्यातूनही या रागाचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)