शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

पुसद नगरपरिषदेच्या निवडणुकीने वातावरण तापले

By admin | Updated: November 9, 2016 00:34 IST

येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीने थंडीतही वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या रिंगणात हॅट्ट्रिक

हॅट्ट्रिक साधण्यासाठी दोघे रिंगणात : निवडणुकीत चौथ्यांदा तिघेजण अजमावित आहेत भाग्यपुसद : येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीने थंडीतही वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या रिंगणात हॅट्ट्रिक साधण्यासाठी दोघे जण तर सलग चौथ्यांदा तिघेजण भाग्य आजमावित आहेत. दरम्यान सलग सहा वेळा सदस्य राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीताबाई कांबळे यावेळी निवडणुकीतून बाहेर आहेत. या निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेचा, जनहितासाठी कष्ट करणाऱ्या उमेदवारास निवडण्याची नागरिकांची मानसिकता दिसून येत आहे. यावेळी हॅट्रीक साधलेले तर काही जण हॅट्रिक साधण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे डॉ. मोहम्मद नदीम यांची निवडणूक लढविण्याची चौथी वेळ आहे ते तीन वेळा निवडून आले आहेत. डॉ. अकील मेमन हॅट्रीक साधण्यासाठी उभे आहेत. राष्ट्रवादीचे राजू दुधे यांची ही चौथी टर्म आहे. तीन वेळा निवडून आले आहे. राष्ट्रवादीतून भाजपा तर गेलेले नगरसेवक निरज पवार चौथ्यांदा निवडणूक लढवत आहे. शिवसेनेचे अ‍ॅड़ उमाकांत पापीनवार हॅट्रिक साधण्यासाठी तिसऱ्यांदा उभे आहेत. अ‍ॅड़ भारत जाधव, अजय पुरोहित, दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. १९८५ पासून नगरसेवक होण्याचा मान सीताबाई कांबळे यांना मिळाला् त्यानंतर सलग सहाही निवडणुकीत त्या विजयी झाल्यात. सहा टर्ममध्ये त्यांनी साडे तीन वर्षे नगराध्यक्षपद विभूषित केले. त्याचबरोबर त्यांनी शिक्षण सभापती, आरोग्य सभापतीपदही विभूषित केले आहे. पक्षासाठी काम करायचे आहे, अशी भूमिका घेत त्यांनी निवडणुकीत सहभाग घेतला नसावा अशी चर्चा होत आहे. (तालुका प्रतिनिधी)नगराध्यक्षासह १५ महिला जाणार नगरपरिषदेत पुसद नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले असून नगराध्यक्षासह १५ महिला नगरपरिषदेत जाणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेत महिलाराज येणार आहे. पुसद नगरपरिषदेची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होत आहे. १४ प्रभागातून २९ नगरसेवक निवडून जाणार आहे. यंदा नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. तर २९ पैकी १५ जागा महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे या नगरपरिषदेत १६ महिला पोहोचणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अनिताताई मनोहरराव नाईक, भाजपा-सेनेच्या डॉ. अर्चना अश्विनी जयस्वाल, काँग्रेसच्या शुभांगी प्रकाश पानपट्टे रिंगणात आहे. राज्याचे ज्येष्ठमंत्री व राष्ट्रवादीचे नेते आमदार मनोहरराव नाईक यांच्या सुविद्य पत्नी रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. खऱ्या अर्थाने ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची झाली आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते डॉ. मोहंमद नदीम, डॉ. वजाहत मिर्झा, अ‍ॅड. सचिन नाईक यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची ठरत आहे. एकंदरित पुसद नगरपरिषदेत नगराध्यक्षाची निवडणूक खऱ्या अर्थाने रंगत आणणार आहे.