शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या खगोल ज्ञानात भर घालणारा तारांगण प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:00 IST

नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत साडेतीन कोटी रुपये खर्चून हा तारांगण प्रकल्प साकारला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही काही दिवस तांत्रिक बाबीमुळे तो सुरू झाला नव्हता. आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लहान मुलांनाच नव्हे तर प्रौढांच्या ज्ञानातही भर घालणारा हा प्रकल्प आहे. आभासी विश्वात नेऊन एक प्रकारे अंतराळाची सैर घडवून आणल्याचा भास होतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना व संशोधकांना अंतराळात घडणाऱ्या घडामोडींची प्राथमिक माहिती तारांगण प्रकल्पातून दिली जात आहे. तारांगणामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या खगोलीय ज्ञानात भर पडणार आहे. यासाठी हा प्रकल्प अतिशय उपयुक्त असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले. शनिवारी सकाळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तारांगणाचा पहिला शो सादर झाला व त्या माध्यमातून औपचारिक लोकार्पण करण्यात आले. नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत साडेतीन कोटी रुपये खर्चून हा तारांगण प्रकल्प साकारला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही काही दिवस तांत्रिक बाबीमुळे तो सुरू झाला नव्हता. कोरोनाच्या मर्यादा असल्याने हे काम रखडले होते. आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, प्रशासक तथा मुख्याधिकारी माधुरी मडावी, अभियंता विनय देशमुख, डॉ. विजय अग्रवाल आदी उपस्थित होते. तारांगणातून अंतराळाबाबतची शास्त्रीय माहिती देण्यात येते. लहान मुलांनाच नव्हे तर प्रौढांच्या ज्ञानातही भर घालणारा हा प्रकल्प आहे. आभासी विश्वात नेऊन एक प्रकारे अंतराळाची सैर घडवून आणल्याचा भास होतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. 

तासाभरात ब्रम्हांडाचा फेरा मारल्याचा होतो भास - येथील आसन व्यवस्था, ध्वनी व्यवस्था व स्लाईड शोचे नियोजन अतिशय योग्य असल्याने तासाभरात ब्रम्हांडाचा फेरा मारल्याचा भास होतो. अद्भुत व अगाध असलेल्या अंतराळाबद्दल अनेक महत्त्वपूर्ण बाबींची माहिती या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. खऱ्या अर्थाने ही जिल्ह्यासाठीच उपलब्धी ठरणार आहे. शिवाय नगरपरिषदेने नेहरू उद्यानाचेही सुशोभीकरण करून तेथे खेळणे बसविले आहे. परिसर सुंदर असल्याने यवतमाळकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

 

टॅग्स :scienceविज्ञान