शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुना घाटात भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून

By admin | Updated: August 24, 2015 00:02 IST

चुलत भावाशी झालेल्या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात देऊन परतणाऱ्या तरुणावर पत्नीसमोरच चाकूचे वार करून निर्घृण खून केल्याची घटना अर्जुना घाटात रविवारी भरदुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

पत्नीसमोर घडला थरार : पोलिसात तक्रार दिल्याचा वचपा यवतमाळ/हिवरी : चुलत भावाशी झालेल्या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात देऊन परतणाऱ्या तरुणावर पत्नीसमोरच चाकूचे वार करून निर्घृण खून केल्याची घटना अर्जुना घाटात रविवारी भरदुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. मारेकऱ्यांनी पोटावर आणि मांडीवर चाकूने १० ते १२ वार करून खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला वाचविण्यासाठी पत्नीने मदतीची याचना केल्यानंतरही तासभर कुणीही धावून आले नाही. अजित विनायक चव्हाण (३५) रा. माळम्हसोला असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री गावातील स्वस्त धान्य दुकानदार असलेला चुलत भाऊ राजेश बद्रू चव्हाण याच्यासोबत धान्य दरावरून अजितचा वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी अजित आपली पत्नी ललिता चव्हाणला सोबत घेऊन रविवारी दुपारी १२ वाजता यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात आला. या ठिकाणी तक्रार देऊन आपल्या दुचाकीने पती-पत्नी गावाकडे निघाले होते. अर्जुना घाटातील पहिल्या वळणावरील गतिरोधकावर त्यांची दुचाकी पोहोचली. त्यावेळी वेग कमी होताच दबा धरुन बसलेल्या तिघांनी दुचाकीला धक्का देऊन दोघांनाही खाली पाडले. काही कळायच्या आत अजितवर चाकूने वार केले. सोबत असलेल्या पत्नीलाही मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अजितला पाहून पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केली. सुमारे तासभर कुणीही मदतीसाठी धावून आले नाही. त्यानंतर या घटनेची माहिती कुणी तरी ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलीस घटनास्थळावर पोहोचले तेव्हा अजित निपचित आढळून आला. त्याला शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी ललिता चव्हाणच्या तक्रारीवरून आरोपी राजेश बद्रू चव्हाण, विशाल ऊर्फ चिकू राजेश चव्हाण, प्रवीण पोटे, सचिन सुत्रावे सर्व रा. माळम्हसोला यांच्या विरोधात पोलिसांनी कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. विशाल व त्याच्या दोन साथीदारांनी रस्त्यात अडवून थेट हल्ला केला. या कटात राजेशने मदत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. (कार्यालय प्रतिनिधी) अजितवर होती पाळत गावात झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात गेलेल्या अजित चव्हाणवर आरोपींनी पाळत ठेवली होती. तो कुठे जातो याची माहिती मिळवून मारेकरी अर्जुना घाटातील गतिरोधकासमोरील झुडूपामध्ये दबा धरुन बसले होते. त्याच्या प्रत्येक हालचालीची इत्थंभूत माहिती मारेकऱ्यांंना दिली जात होती. त्यामुळे या घटनेतील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेनेही तपास करीत असून आरोपींच्या अटकेनंतर या घटनेचे रहस्य आणखी उलगडणार आहे.