शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खून करून अपघाताचा देखावा

By admin | Updated: March 6, 2015 02:16 IST

वणी-शिरपूर मार्गावरील निलगीरी वनालगत मंदरजवळील एका पुलाजवळ गेल्या २३ फेब्रुवारीला प्रशांत चिंतामण रणदीवे (३१) रा.उकणी, या युवकाचा मृतदेह आढळून आला होता.

वणी : वणी-शिरपूर मार्गावरील निलगीरी वनालगत मंदरजवळील एका पुलाजवळ गेल्या २३ फेब्रुवारीला प्रशांत चिंतामण रणदीवे (३१) रा.उकणी, या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याप्रकरणी प्रथम अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासाअंती तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली.प्रशांत चिंतामण रणदीवे हा युवक २२ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजतापासून उकणी येथून आपल्या एम.एच.२९-डब्ल्यू.१८३८ क्रमांकाच्या दुचाकीने बाहेर गेला होता. तो दुसऱ्या दिवशी २३ फेब्रुवारीला वणीवरून शिरपूरकडे जाणाऱ्या मार्गावरील निलगीरी वनाजवळील एका नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाजवळ तो दुचाकीसह पडून असल्याचे आढळले होते. घटनेची माहिती कळताच ठाणेदार अस्लम खान ताफ्यासह तेथे पोहोचले होते. स्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. मृतकाच्या डोक्यावर आणि पोटावर जखमा आढळून आल्या होत्या. प्रशांतचा मृतदेह रूग्णालयात आणल्यानंतर तेथे नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती. काहींनी पोलीस ठाण्याकडे धाव घेत हा घातपात असल्याचा दावा केला होता. मात्र प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्यावेळी अपघाताची नोंद केली होती. तथापि मृतक प्रशांतच्या डोक्याला व पोटाला गंभीर मार असल्याने पोलीस खुनाच्या दिशेनेही तपास करीत होते. या दरम्यान मृतकाच्या वडिलांनी तक्रार करून हा घातपाच असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. काल बुधवारी गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यांनी पोलीस अधीक्षकांशी बोलून याप्रकरणी कारवाई करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर लगेच रात्री यवतमाळ येथील गुन्हे अन्वेषण पथकाने निळापूर येथील अनिल गोविंदा बोढाले नामक युवकाला ताब्यात घेतले. त्यानंतर वणी पोलिसांनी गुरूवारी पूजा अनिल बोढाले (२७), विनोद मिलमीले (३२) रा.विरकुंड, वामन गोपाल पाचभाई (४५) रा.शेलू या चौघांना गुरूवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. यातील अनिल बोढाले हा यापूर्वी भाजपा युवा मोर्चाचा निळापूर शाखा अध्यक्ष होता, अशी माहिती आहे. तथापि अनिल सध्या कोणत्याही पदावर नसल्याचे सांगण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)पोलिसांची वर्चस्वासाठी लढाईया प्रकरणाचा तपास येथील ठाणेदार अस्लम खान यांच्याकडे होता. त्यांनी डीबी पथकातील साजीद व इतर सदस्यांसह या प्रकरणातील कॉल डिटेल्स प्राप्त केले. त्यावरून ते आरोपींपर्यत पोहोचण्याच्या बेतात होते. याबाबत काही वरिष्ठांना माहितीही देण्यात आली. दरम्यान गृह राज्यमंत्र्यांचा दौरा आला. त्यात बुधवारी येथील पोलीस व्यस्त होते. नेमकी हिच संधी साधून गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पुजलवार, पतंगे, गजानन डोंगरे, यादव, साठवणे, जागृत आदींनी आपली मोहीम फत्ते केली अन् अनिल बोढाले याला ताब्यात घेतले. यावरून पोलिसांमध्येच वर्चस्वाची लढाई रंगली. गुन्हा कोणी उघडकीस आणला, आरोपी कोणी ताब्यात घेतला, यावरून त्यांच्यातच चांगली ‘तू-तू,मै-मै’ झाली. अखेर अनिलला वणी पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक रात्रीच यवतमाळला परत गेले. ‘लोकमत’चा अंदाज ठरला खराप्रशांतच्या मृत्युप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी २३ फेब्रुवारीला गर्दी केली होती. मात्र तेव्हा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त होताच, याप्रकरणी पुढील निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले होते. ‘लोकमत’ने तेव्हाच अपघाताचा गुन्हा नोंद होऊनही पोलीस खुनाच्या दिशेनेही तपास करीत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. आता ते वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. पोलिसांनी आरोपींना गाफील ठेवण्यासाठीच ही खेळी केली. त्यामुळे आरोपी निश्चिंत होते. अशी घडली घटनाया घटनेतील मृतक प्रशांतचे दोन वर्षांपासून पूजाशी प्रेमसंबंध होते. गेले काही दिवस मृतकाचे पूजाला सतत भ्रमणध्वनी येत होते. त्याला कंटाळून तिने याबाबत कुटुंबियांना अवगत केले होते. नंतर संगनमत करून या चौघांनी मृतक प्रशांतला २३ फेब्रुवारीला सायंकाळी निळापूर येथे घरी बोलविले. तेथे रात्री १0 वाजताच्या सुमारास प्रशांतला तिघांनी पकडून ठेवले. एकाने त्याच्या डोक्यावर वार केले. त्यात प्रशांत ठार झाला. नंतर त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून यापैकी दोघांनी दुचाकीवर मधात ठेवून घुग्गुस मार्गावरील निलगिरी वनाजळील एका निर्माणाधीन पुलाजवळ टाकून तेथे अपघाताचा देखावा निर्माण केला. घरी परत आल्यानंतर त्यांनी चादर व रक्ताने माखलेले कपडे, तसेच मृतकाचा मोबाईल निळापूर येथील शेतात जाळून अपुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.