शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकार बळी खैरे यांना आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:44 IST

यवतमाळ : युगकवी मार्शल केतन पिंपळापुरे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त ‘आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्कार’ येथील चित्रकार व कवी बळी ...

यवतमाळ : युगकवी मार्शल केतन पिंपळापुरे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त ‘आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्कार’ येथील चित्रकार व कवी बळी खैरे यांना जाहीर झाला आहे. येत्या ३१ जुलै रोजी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

पुरस्कार प्रदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अ‍ॅड. सुनील सारीपुत्त राहतील. आंबेडकरी विचारवंत डॉ. वामन गवई यांच्या हस्ते पुरस्कार कवी खैरे यांना प्रदान केला जाईल. ‘संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी दूर जाणारे राजकारण आणि भारतीय लोकशाहीचे भविष्य’ या विषयावर यावेळी परिसंवाद होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख प्रकाश दार्शनिक, केंद्रीय सदस्य सुदाम सोनुले, डॉ. दीपक ठमके, अभियंता प्रशांत ठमके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

समता सैनिक दल, युगकवी केतन पिंपळापुरे स्मृती प्रतिष्ठान व समता संगर प्रकाशनने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. कवी खैरे यांचे समता सैनिक दलाच्या वतीने कौतुक करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रोग्रामर कमिटी सदस्य प्रा. प्रकाश दातार, जिल्हा संघटक चंदू मून, जयप्रकाश चव्हाण, अमोल भोसले, विवेक कांबळे, विवेक वानखेडे आदी उपस्थित होते.