तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना

By अविनाश साबापुरे | Published: May 24, 2024 09:36 AM2024-05-24T09:36:45+5:302024-05-24T09:37:29+5:30

‘एनईपी-२०२०’नुसार केंद्र सरकारने यापूर्वीच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला; परंतु प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राने  बालवाटिका ते दुसऱ्या वर्गासाठीचा आराखडा तयार केला. तो अंतिम झाला आहे.

All textbooks from 3rd to 12th will be replaced; Plan ready, suggestions sought from citizens till June 3 | तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना

तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना

यवतमाळ : नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच बदलणार आहे. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पुढच्या सत्रात सर्वच वर्गांची पाठ्यपुस्तके बदलण्याची शक्यता आहे. हा आराखडा ‘एससीईआरटी’ने खुला केला असून, त्यावर ३ जूनपर्यंत सूचना मागविल्या आहेत.

‘एनईपी-२०२०’नुसार केंद्र सरकारने यापूर्वीच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला; परंतु प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राने  बालवाटिका ते दुसऱ्या वर्गासाठीचा आराखडा तयार केला. तो अंतिम झाला आहे. आता परिषदेने इयत्ता तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला. त्यावर ३ जूनपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी साहित्यनिर्मितीचे काम आमच्याकडे असते. अंगणवाडी पाठ्यपुस्तक छपाईबाबत आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही पाठ्यपुस्तके याच वर्षी पुरविण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
- कृष्णकुमार पाटील, संचालक ‘बालभारती’

अंगणवाडीच्या पुस्तकांसाठी प्रतीक्षा 
- ‘एनईपी’नुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता दुसरी हा शिक्षणाचा पायाभूत स्तर मानला गेला आहे. त्यात अंगणवाडीला बालवाटिका संबोधण्यात आले आहे. 
- आता बालवाटिका एक, बालवाटिका दोन, बालवाटिका तीन तसेच इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी या पाच वर्गांसाठीचा अभ्यासक्रम आराखडा ‘एससीईआरटी’ने तयार केला आहे.  लवकरच पाठपुस्तकांची छपाई  सुरू केली जाणार आहे. 
 

 

Web Title: All textbooks from 3rd to 12th will be replaced; Plan ready, suggestions sought from citizens till June 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.