शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट...! कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा जिल्ह्यात हातपाय पसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 05:00 IST

रविवारी दिवसभरात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या चार जणांपैकी दोघे यवतमाळ येथील तर घाटंजी येथील एक आणि वणी येथील एक रुग्ण आहे. यात एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी एकंदर ३३१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३२७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७२ हजार ९५० जणांना कोरोनाची लागण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दोन महिन्यांत उतरंडीला लागलेला कोरोनाचा संसर्ग मागील आठवड्यापासून पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. रविवारी आणखी चार रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील सक्रिय पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून २२ झाली आहे. दरम्यान रविवारी दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. रविवारी दिवसभरात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या चार जणांपैकी दोघे यवतमाळ येथील तर घाटंजी येथील एक आणि वणी येथील एक रुग्ण आहे. यात एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी एकंदर ३३१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३२७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७२ हजार ९५० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ७१ हजार १४० रुग्ण कोरोनावर मात करून ठणठणीत झाले आहे. मात्र १७८८ जणांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख ६७ हजार ७६६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सहा लाख ९४ हजार ७३२ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. सध्या कोरोना पॉझिटिव्हिटी दर ९.५० असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १.२१ आहे. तर मृत्यू दर २.४५ आहे. 

यवतमाळ शहरात रात्रीही होणार कोविड लसीकरण - वाढत्या कोरोना आणि अत्यल्प झालेले लसीकरण पाहता जिल्हा प्रशासनाने यवतमाळ शहरात रात्रीही लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वंजारी फैल, लोखंडी पूल, तलाव फैल, पिंपळगाव शाळा, आठवडी बाजार, भोसा रोड, दत्त चौक, समर्थवाडी, बाजोरियानगर, पाटीपुरा, कळंब चौक, अंजुमन शाळा, जफरनगर शाळा, उमरसरा उपकेंद्र, मुलकी उपकेंद्र, जयविजय चौक, लोहारा उपकेंद्र, वाघापूर उपकेंद्र अशा २० ठिकाणी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  ठेवली जाणार आहे. 

चहुबाजूंनी हल्ला, विविध तालुक्यातून फुगतोय रुग्णांचा आकडा

- २९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात अचानक एकाच दिवशी नऊ कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे दहाच्या खालील गेलेला सक्रिय रुग्णांचा आकडा पुन्हा दोन अंकी झाला. आता तर दरदिवशी तीन-चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. विशेष म्हणजे रोज आढळणारे रुग्ण कोणत्याही एका ठराविक परिसरातील नाहीत. पाच दिवसांपूर्वी दारव्हा, त्यानंतर पुसद, वणी, घाटंजी अशा वेगवेगळ्या तालुक्यांमधून रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका यवतमाळ जिल्ह्यात चहुबाजूंनी वाढत असल्याचे हे निदर्शक मानले जात आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या