शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

५० गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला संततधार पावसामुळे पूर आला आहे. पावसामुळे विदर्भ व मराठवाडा सीमेवरील इसापूर धरणात तब्बल ८१.७३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाची पाणीपातळी ४३९.०७ मीटर झाली आहे. धरणात ११०२.९७ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. गुरुवारी सकाळपासून धरणात ७८.७७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे.

ठळक मुद्देपैनगंगा नदीला पूर : उमरखेड तालुक्यातील इसापूर धरण ८२ टक्के भरले

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : विदर्भ व मराठवाडा सीमेवरील इसापूर धरणात ८२ टक्के जलसाठा झाला आहे. पैनगंगा नदीवर हे धरण निर्माण करण्यात आले. संततधार पावसामुळे नदीला पूर आल्याने नदीकाठावरील तालुक्यातील ५० गावांना तहसील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला संततधार पावसामुळे पूर आला आहे. पावसामुळे विदर्भ व मराठवाडा सीमेवरील इसापूर धरणात तब्बल ८१.७३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाची पाणीपातळी ४३९.०७ मीटर झाली आहे. धरणात ११०२.९७ दलघमी पाणीसाठा निर्माण झाला आहे. गुरुवारी सकाळपासून धरणात ७८.७७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. मात्र तूर्तास धरणाचा कोणताही दरवाजा उघडला नाही. तथापि, तहसील प्रशासनाने नदी काठावरील ५० गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पैनगंगा दुथडी भरून वाहात आहे. पैनगंगा आणि कयादू या दोन नद्यांचा तालुक्यातील चिंचोली येथे संगम होतो. यामुळे नदीच्या पात्रात पाणी वाढले आहे. परिणामी काठावरील सुमारे ५० गावांना धोका होण्याची शक्यता आहे. मार्लेगाव, लिंबगव्हाण, तिवडी, टाकळी, चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, उंचवडद, दिघडी, चातारी, बोरी, मानकेश्वर, कोपरा, सिंदगी, गाडी (वन), बोरी, सावळेश्वर, मुरली, येदापेंदा, खरबी आदी ५० गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे.अद्याप धरणाचा दरवाजा उघडला नाहीइसापूर धरणात पाणीसाठा वाढत असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र अद्याप धरणाचा कोणताही दरवाजा उघडण्यात आला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पूरनियंत्रण कक्ष प्रमुख तथा उपविभागीय अभियंता हनुमंत धुळगंडे यांनी केले आहे. तो व्हिडीओ इसापूरचा नसल्याचे स्पष्ट केले.तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. संबंधित पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहायकांना तत्पर राहण्याचे आदेश दिले.- रूपेश खंडारेतहसीलदार, उमरखेड

टॅग्स :RainपाऊसDamधरण