९० गावांतील शेतकऱ्यांनी पुकारला पैनगंगा नदीच्या पात्रात एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 13:21 IST2018-11-19T13:20:53+5:302018-11-19T13:21:55+5:30
यवतमाळ जिल्ह्यातून वाहत असलेल्या पैनगंगा नदीवर नदीकाठच्या ९० गावांतील शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.

९० गावांतील शेतकऱ्यांनी पुकारला पैनगंगा नदीच्या पात्रात एल्गार
अविनाश खंदारे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातून वाहत असलेल्या पैनगंगा नदीवर नदीकाठच्या ९० गावांतील शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. या नदीवर धरण बांधले तेव्हापासून नदीकाठच्या गावांवर संकट निर्माण झाले आहे. या नदीच्या काठावरील ९० गावांना फक्त पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग करून उध्वस्त केले जाते. बाकी वर्षभर कालव्यात पाणी सोडले जाते. त्यावेळी नदीकाठ मात्र ठणठणीत कोरडे राहतात. त्यामुळे नदीपात्रात रब्बी हंगामासाठी त्वरीत पाणी सोडा ही मागणी घेऊन सोमवारी दुपारी १२ पासून शेकडो शेतकरी नदीच्या पात्रात उतरले. हे आंदोलन यवतमाळ जिल्ह्यातील बोरी (चातारी ) येथे सुरू आहे. या आंदोलनात महिला आंदोलकही मोठ्या प्रमाणात उतरल्या आहेत.