शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा भूमिपूजनांचा धडाका

By admin | Updated: August 17, 2014 23:25 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा गावागावांत पुढाऱ्यांनी लावला होता. आता विधानसभेच पडघम वाजायला सुरूवात होताच विद्यामान आमदार आणि इच्छुक

चाहूल विधानसभेची : पांढरकवड्यात संगीत रजनी यवतमाळ : लोकसभा निवडणुकीपूर्वी विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा गावागावांत पुढाऱ्यांनी लावला होता. आता विधानसभेच पडघम वाजायला सुरूवात होताच विद्यामान आमदार आणि इच्छुक जनतेत जाण्यासाठी कोणतही संधी सोडत नाही. त्यातून गावागावांत पुन्हा भूमिपूजनाचा सपाटा सुरू झाला आहे. विधानसभेची आचार संहिता लागल्यानंतर दिलेल्या आश्वसनाची पूर्ती करणे शक्य होणार नाही. म्हणून भूमिपूजन करून काम करणार याचे टोकण जणू ही नेते मंडळी देताना दिसत आहे. जिल्ह्यात सध्या आमदारांची रेलचेल आहे. विधानसभेचे सात आणि विधान परिषदेचे चार आमदार आहेत. दोन तालुक्याला एक आमदार वाटून घेतला तरी ते सहज शक्य आहे. विधान परिषदेचेही आमदार आपला निधी विकास कामावर खर्ची घालत आहे. त्यामुळे भूमिपूजनाच्या कार्यक्रमात चांगलीच भर पडली आहे. ज्यांच्याकडे वाटण्यासाठी शासनाचा निधी नाही, अशी आमदारकीस इच्छूक असलेली मंडळी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संपर्कात येण्याचा प्रयत्न करत आहे. आर्णी विधानसभेतून इच्छूक असलेल्या माजी पोलीस अधिकाऱ्याने चक्क स्वखर्चाने संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी खास पुणे आणि मुबंई येथून कलावंत आणले. या कार्यक्रमाची पत्रिका छापतांना स्थानिक खासदार आणि त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नावा वापर करण्यात आला. आजपर्यंत जी व्यक्ती कधीच दिसली नाही. ती एकदम पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नावाने कार्यक्रम कसा काय घेते, असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला. त्यांनी ही बाब खासदाराच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पुढचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याची वेळ त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर आली. पांढरकवड्यानंतर, घाटंजी आणि आर्णी येथे संगीत रजनी घेण्यात येणार होती. कानउघाडणी झाल्याने त्या इच्छूक उमेदवाराला गाशा गुंडाळावा लागला. विशेष म्हणजे प्रस्थापित मंत्र्या विरोधात अच्छे दिन असलेल्या पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला होता. स्थानिक पातळीवर आपल्याला कोणी विचारणार स्पर्धक नसल्याने येथीलच इरसाल कार्यकर्त्यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्याला निवडणुकीसाठी उभे राहण्याचा सल्ला दिला. मात्र सध्यातरी त्यांचा संपूर्ण कार्यक्रम बिचकला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)