शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार लिंक’विना अडली शिष्यवृत्ती

By admin | Updated: February 18, 2017 00:33 IST

शिष्यवृत्तीत परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करण्यात मुख्याध्यापकांनी हयगय केली.

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : शिक्षणाधिकारी कार्यालयाचे थांबविले वेतन अविनाश साबापुरे   यवतमाळ शिष्यवृत्तीत परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करण्यात मुख्याध्यापकांनी हयगय केली. त्यामुळे जानेवारी महिन्याची त्यांची शिष्यवृत्ती बँक खात्यात जमा होऊ शकली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली असून जोवर विद्यार्थ्यांचे खाते आधार लिंक होत नाही, तोवर शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दर पंधरवड्यात आढावा घेतला जात आहे. परंतु, वारंवार सूचना देऊनही अनेक मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीची रक्कम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दरमहिन्याला बँक खात्यात मिळत आहे. परंतु, आता विविध लाभाच्या योजनांचे पैसे खात्यात जमा करताना, त्या खात्याशी लाभार्थ्याचा आधार क्रमांक जोडणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील १५८ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्यापही त्यांच्या खात्याशी लिंक झालेले नाही. मुख्याध्यापकांनी यात हयगय केली आहे. मात्र, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय कमी पडत आहे. याच कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे वेतन थांबवून ठेवले आहे. जोपर्यंत मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड त्यांच्या खात्याशी लिंक झाल्याचे प्रमाणपत्र बँकेकडून मिळवत नाही, तोपर्यंत वेतन निघणार नाही. शिवाय वेळेत काम न झाल्यास फेब्रुवारीचेही वेतन थांबविण्यात येणार आहे. राज्यात मे २००८ पासून एनएमएमएस (नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्किम) ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात आहे. ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. वार्षिक सहा हजारांची ही शिष्यवृत्ती दरमहिन्याला ५०० रुपये याप्रमाणे वाटप केली जाते. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावर होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांचीच ‘एनएमएमएस’करिता निवड केली जाते.