शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीबहुल मोखाड विकासापासून कोसो दूर

By admin | Updated: August 22, 2014 00:09 IST

तालुक्यातील डोंगरकुशीत वसलेले छोटेसे आदिवासी गाव मोखाड स्वातंत्र्याच्या ६८ वर्षातही विकासापासून कोसो दूर आहे. ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत नळयोजनेचे निकृष्ट काम केल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

पुसद : तालुक्यातील डोंगरकुशीत वसलेले छोटेसे आदिवासी गाव मोखाड स्वातंत्र्याच्या ६८ वर्षातही विकासापासून कोसो दूर आहे. ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत नळयोजनेचे निकृष्ट काम केल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. या गावात नागरी सुविधांचा अभाव असून, येथे अस्वच्छतेने कळस गाठला आहे. परिणामी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व प्रकाराबाबत ग्राहक संरक्षण संस्थेने तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुसद तालुक्यातील मोखाड अडीचशे घरांचे छोटेसे गाव आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ६८ वर्षातही येथे विकास पोहोचला नाही. येथील सरपंच व सचिवांनी संगनमत करून शासनाच्या सर्व विकासात्मक योजना स्वत:च्याच घशात घातल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. गतवर्षी तयार करण्यात आलेला येथील सिमेंटचा रस्ता यंदा हरवला आहे. येथे सांडपाण्याच्या नाल्या नाहीेत. मात्र नालीसफाईच्या नावावर हजारो रुपयांची उचल केली आहे. ग्रामसभा येथे होतच नाही. तसेच गावातील सांडपाणी नाल्याअभावी येथील सार्वजनिक विहिरीत जात असल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. या दूषित पाणी व घाणीच्या साम्राज्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर वसूली मात्र शंभर टक्के असल्याचे गावकरी सांगतात. शासनाच्या ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत तब्बल १२ लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या नळयोजनेत येथील सरपंच व सचिवाने निकृष्ट दर्जाचे काम करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. या नळयोजनेपासून बरेचसे लोक वंचित असल्याची धक्कादायक माहिती पुढे अली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन योग्य चौकशी केल्यास येथील वास्तव बाहेर येईल, अशी येथील गावकऱ्यांना आशा आहे. (प्रतिनिधी)