कबड्डीच्या वादात दोन गटांत हाणामारी

By Admin | Updated: August 22, 2015 02:34 IST2015-08-22T02:34:32+5:302015-08-22T02:34:32+5:30

कबड्डी खेळण्याच्या वादाचे पर्यावसान तुफान हाणामारीत होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील राजुरा येथे गुरुवारी सायंकाळी घडली.

Action in two groups in Kabaddi dispute | कबड्डीच्या वादात दोन गटांत हाणामारी

कबड्डीच्या वादात दोन गटांत हाणामारी

राजुराची घटना : चार गंभीर, २२ जणांवर गुन्हा
दारव्हा : कबड्डी खेळण्याच्या वादाचे पर्यावसान तुफान हाणामारीत होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील राजुरा येथे गुरुवारी सायंकाळी घडली. कुऱ्हाड, चाकू आणि काठींचा सर्रास वापर हाणामारीत करण्यात आला. या प्रकरणी दोनही गटांच्या २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजुरा येथील एका मोकळ्या मैदानात गावातील मुले नेहमी प्रमाणे कबड्डी खेळत होते. याच पटांगणात काही तरुणही कबड्डी खेळले. या खेळादरम्यान त्यांच्यात वाद झाला. या वादानंतर दोनही गटात हाणामारी झाली. या हाणामारीत अंकुश गव्हाणे, माणिक गव्हाणे, रमेश चव्हाण, सुधाकर राठोड गंभीर जखमी झाले. परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी दोनही गटांच्या २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात नितेश जाधव, संतोष चव्हाण, उमेश जाधव, हिंमत जाधव, संदीप राठोड, सुधाकर राठोड, रमेश चव्हाण, रुपेश चव्हाण, मुक्का चव्हाण, माला चव्हाण, बेबी चव्हाण, माया राठोड, रुखमा राठोड, हरी राठोड, अंकुश गव्हाणे, माणिक गव्हाणे, गणेश गव्हाणे, बाबूराव गव्हाणे, रामराव गव्हाणे, रवी गव्हाणे, शामराव गव्हाणे आदी २२ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Action in two groups in Kabaddi dispute