शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या दुकानांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वी चिकन, मटण विक्रीची दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. अनेक दिवस ही दुकाने बंद असल्याने ज्या दिवशी ही दुकाने उघडली, त्या दिवशी वणीतील चिकन-मटण विक्रीच्या दुकानांवर नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली. त्यामुळे प्रशासनाला चांगलाच घाम फुटला.

ठळक मुद्देसहा जणांविरूद्ध गुन्हे : वाढत्या गर्दीवर प्रशासनाचा ‘वॉच’, गस्तीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : एकाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र दुकानदारांकडून ‘सोशल डिस्टंसींग’चा फज्जा उडविला जात असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात येताच, बुधवारी रात्री नगरपालिकेच्या पथकाने शहरातील सहा दुकानदारांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी संबंधित दुकानदारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारत भादंवि १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वी चिकन, मटण विक्रीची दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. अनेक दिवस ही दुकाने बंद असल्याने ज्या दिवशी ही दुकाने उघडली, त्या दिवशी वणीतील चिकन-मटण विक्रीच्या दुकानांवर नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली. त्यामुळे प्रशासनाला चांगलाच घाम फुटला. एकीकीडे गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असताना दुसरीकडे मांस विक्रीच्या दुकानांवर होणारी गर्दी चिंतेत टाकणारी होती. त्यामुळे प्रशासनाने मांस विक्री करताना ‘सोशल डिस्टंसींग’ पाळण्याचे आदेश संबंधित विक्रेत्यांना दिले. मात्र बुधवारी रात्रीत्याचे पालन होताना दिसले नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या पथकाने ‘सोशल डिस्टंसींग’ चे उल्लंघन करणाऱ्या सहा चिकन, मटण विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली. यात शेख मोहम्मद अल कमल, हमीद चौैक, तमजीद अहेमद इंदिरा चौैक, तोहोद अहेमद शब्बीर, हमीद चौैक, मोहम्मद ईरफान अब्दुल रज्जाक, अनिस हॉलसमोर, वणी, तोकीर अहेमद व एका महिलेचा समोवश आहे. या कारवाईने मांस विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.पोलिसांनी संचारबंदी केली अधिक तीव्रकोणतेही ठोस कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नव्याने काही निर्णय घेतले आहे. त्यात जिवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी सहा ते दुपारी ३ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी करीत गुरूवारी पहिल्याच दिवशी वणी पोलिसांनी संचारबंदी तिव्र केली. दुपारी ३ वाजतानंतर रस्त्यांवरून अकारण भटकणाºयांवर दंडुके उगारले. त्यामुळे काही वेळातच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

टॅग्स :Policeपोलिस